२६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबीर

 



२६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबीर

◾२०५ च्या वर पोलीस अधिकारी व नागरिकांनी केले रक्तदान तर २६० नागरिकांची नेत्र तपासणी

◾संविधान दिनानिमित्त महामानवाला अभिवादन व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर  पोलीस स्टेशन  जिल्हा. चंद्रपूर येथे दिनांक २६/११/२०२१ रोजी मुंबई हल्ल्यात शाहिद झालेले अधिकारी/जवान यांचे स्मृतीप्रित्यर्थ तसेच शहीद दिना निमित्य  भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर मा पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली  Lifeline Blood Bank आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे शुभारंभ अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे हस्ते २६ नोव्हेम्बर संविधान दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले होते तसेच मुंबईवरील २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदाना मानवंदना श्रद्धांजली देऊन त्यानंतर संविधान दिना निमित्य शपथ घेण्यात आली ज्यामध्ये पोलीस अधिकारी/कर्मचारी/कुटुंब असे ३० जणांनी नागरिक १७५ ज्यामध्ये पुरुष/ महिला एकूण २०५ पुरुष/महिला यांनी  रक्तदान  केले  तसेच एकूण २६० पुरुष/महिला  यांची नेत्र तपासणी करण्यात आली सदर कार्यक्रम मा श्री. राजा पवार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. उमेश पाटील यांचे नेतृत्वात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला असून कार्यक्रमात मा श्री. हरीश शर्मा नगराध्यक्ष, मा श्री.  चंदन सिंग चंदेल,श्री.  काशी सिंग, श्री. अजय दुबे, श्री. सिक्की यादव, श्री. राजू झोडे, श्री. घनश्याम मूलचंदानी, श्री. करीम भाई, श्री. बादल उराडे तसेच सर्व पत्रकार बंधू सर्व बल्लारशा येथील ग्रामीण भागातील नागरीक यांनी सहभाग घेतला.





Post a Comment

0 Comments