जिल्ह्यातील सर्व शासकीय ग्रंथालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे - जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे


जिल्ह्यातील सर्व शासकीय ग्रंथालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे - जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे

 ◾शासकीय ग्रंथालय सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना भाजयुमो तर्फे निवेदन 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरोना वैश्विक महामारी मुळे संपूर्ण देशासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय ग्रंथालय बंद करण्यात आले होते परंतु आता हळूहळू सर्व शासकीय कार्यालय, शॉपिंग मॉल, मंगल कार्यालय तसेच चित्रपटगृह सुद्धा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले परंतु ज्या ग्रंथालयातून एक विद्यार्थी आपले भविष्य घडवतो त्या ग्रंथालयाला खोलण्याची आवश्यकता या सरकारला वाटत नाही आणि त्यांनी अजूनही ग्रंथालया वरची बंदी हटविली नाही ज्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. जेव्हा ही बाब विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी वेळ न घालवता विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना परस्पर भेटून जिल्ह्यातील सर्व शासकीय ग्रंथालय सुरू करण्या संबंधी चर्चा केली व निवेदन सादर केले या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी साहेबांनी ग्रंथालय सुरू करण्या संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिली. व लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन आदेश पारित करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष मोहितडंगोरे, जिल्हा सोशल मीडिया संयोजक आदित्य शिंगाडे यांनी उपस्थित होते . 








Post a Comment

0 Comments