महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा ब्रह्मपुरी च्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा स्नेहमिलन तथा सत्कार सोहळा संपन्न

 



महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा ब्रह्मपुरी च्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा स्नेहमिलन तथा सत्कार सोहळा संपन्न

ब्रह्मपुरी ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा ब्रम्हपुरी च्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रोशन यादव, ब्रम्हपुरी पंचायत समितीचे सभापती रामलाल दोनाडकर अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ब्रम्हपुरी शाखाध्यक्ष डाॅ. रवी रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती श्री रामलालजी दोनाडकर तथा ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यादव  साहेब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक रवि रणदिवे यांनी केल्यानंतर ब्रम्हपुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नेताजी मेश्राम, दिवाकर मंडपे ,जीवन बागडे दिलीप शिनखेडे सर, विजय मुळे सर या़ंचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ब्रह्मपुरी शाखा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीचे पत्रकार सचिव नंदु गुड्डेवार, उपाध्यक्ष राहुल मैंद, चंद्रशेखर सातव, प्रदीप बिंजवे, मधुकर मेश्राम, अमरदीप लोखंडे, प्रशांत राऊत, तुलेश्वरी बालपांडे या़ंसह तालुक्यातीलअन्य पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलेश्वरी बालपांडे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल मैंद यांनी केले.







Post a Comment

0 Comments