वनांच्या रक्षकाला वाघानेच केले भक्ष्य : वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

 



वनांच्या रक्षकाला वाघानेच केले भक्ष्य : वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार 

◾ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील घटना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सद्यस्थितीत देशभरातील सर्वच जंगलात व्याघ्र गणनेसाठी वनविभागाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने महिला वनरक्षक ४३ वर्षीय स्वाती ढुमणे या आपल्या सहकार्यासह कोलारा वनपरिक्षेत्रातील कोअर झोन कक्ष क्रमांक ९७ मध्ये ४ वन मजुरासह ट्रान्सेक्ट लाईनवर काम करीत असतांना अचानक त्या ठिकाणी वाघाने महिला वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्यावर हल्ला केला, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वनमजूर ही घाबरले मात्र त्यांनी महिला वनरक्षकांची वाघाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न ही केला मात्र वाघाने महिला वनरक्षकाला घनदाट जंगलात  ओढत नेत त्यांना ठार केले सदर घटना आज शनिवारला सकाळी ८:०० वाजताच्या दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले व जंगलात ईतर ठिकाणी शोध घेतल्यानंतर महिला वनरक्षकाचा मृतदेह आढळून आला आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून वाघाने वनांच्या रक्षकालाच भक्ष्य केल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







Post a Comment

0 Comments