बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन!

 



बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन!

◾२६/११ मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : २६/११ हा दिवस केवळ मुंबईसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी कधीही न विसरण्यासारखा दिवस आहे या दिनी परराष्ट्रातील दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत येऊन मुंबईत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ला केला यात ताज हॉटेल, नरिमन हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारख्या अनेक ठिकाणी हल्ला केला या हल्ल्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले हेमंत करकरे, अशोक कांबळे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक पोलीस बांधव या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले.

     या २६/११ च्या मुंबईतील  झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर येत्या २६ नोव्हेम्बर रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पार पडणार आहे. या शिबिरात रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरात सहभागी होण्यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण असावीत, व्यक्तीचे वजन ५० किलोच्या वर असावेत, आजारानंतर १४ दिवसाच्या कालावधीनंतर रक्तदान करावे, जर कोरोना आरबीडी-ऍन्टीबॉडी ची पातळी ६४० किंवा जास्त असल्यास प्लाझ्मा दान करण्यास तयार असावे तरी या रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्यासह बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस बांधवांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments