चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाह च्या मागणीला यश

 


चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाह  च्या मागणीला यश

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या सुपरफास्ट ट्रेन पॅसेंजर ट्रेन  बंद पडली होती. परीस्थिती जैसे ठीक होत गेली टप्प्या - टप्प्याने ट्रेन चालू करण्यात आले. यातच एक महत्त्वाची ट्रेन म्हणजे बल्लारशाह  गोंदिया पॅसेंजर जे  कोरोना काळानंतर चालू झाली व ती फक्त गोंदियावरून चांदा फोर्ट स्टेशनपर्यंत येत होती. ही ट्रेन बल्लारशा स्टेशन पर्यंत यावी याकरिता चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाह  यांच्यावतीने  महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई व डी.आर.एम नागपूर यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला व आज या मागणीला यश आले. आज ही पॅसेंजर दु १:१५  बल्लारशाह  स्टेशन येथे येणार असून दु.१:४५ वा गोंदिया करिता सुटणार आहे.याकरिता चंद्रपूर रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाह  यांनी रेल्वे प्रशासनाचे  व नागरिकांनी केलेल्या सहकार्यचे आभार मानले आहे.










Post a Comment

0 Comments