वाघ मृतावस्थेत आढळली बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्राअंतर्गत

 



वाघ  मृतावस्थेत आढळली  बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्राअंतर्गत

 ◾५ ते ६ वर्षांची वाघ मादी मृतावस्थेत आढळली : घटना ३ ते ४ दिवसापूर्वी घडल्याचा अंदाज

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज  शनिवार  दि. २७/११/२०२१ रोजी बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्रा अंतर्गत कारवा १ बिटातील कक्ष क्र. ५०० मध्ये वाघ मादी अंदाजे ५ ते ६ वर्ष मृतावस्थेत आढळुन आली. मृतदेह ३ ते ४ दिवसापुर्वीचे असुन वाघाचे शवविच्छेदन राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचे प्रतिनिधीं डॉ. विलास ताजणे पशुधन विकास अधिकारी व डॉ. कुंदन पोडचेलवार पशुवैद्यकिय अधिकारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी पुर्ण केला. मृत वाघाचे सर्व अवयव सुरक्षित असुन मृत्युचे खरे कारण जाणुन घेण्याकरीता व्हिसेरा सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून मध्यवर्ती रोपवाटीका कारवा येथे शवविच्छेदनानंतर दहन करण्यात आले. एकेकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध होते मात्र मानवी समाजाने वनजमिनीवर वाढत्या अतिक्रमणामुळे मानव-वन्यजीव संघर्षात वाढ होत असून वन्य प्राणी मानवी वस्तीत धुमाकूळ घालतांना दिसत आहे शासन-प्रशासन वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनेक उपाययोजना करीत असले तरी वन्य प्राण्यांची तस्करी करण्यासाठी तर सदर वाघाची हत्या करण्यात तर आली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.




Post a Comment

0 Comments