गाडीच्या डिक्कीतून ५० हजार रु, बँक पासबुक, व चेक बुक लंपास करणाऱ्या टोळीला बल्लारपूर पोलिसांनी केली अटक

 



गाडीच्या डिक्कीतून ५० हजार रु, बँक पासबुक, व चेक बुक  लंपास करणाऱ्या टोळीला बल्लारपूर पोलिसांनी केली अटक  

◾२ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यात चोरी करणारे आंतरराज्य टोळी बल्लारपूर पोलिसांच्या हाती लागली दि. १५ नोव्हेम्बरला धोपटाला येथील वेकोली कर्मचारी असलेले ५७ वर्षीय पत्रू  लक्ष्मण येलमुळे यांनी बल्लारपूर येथील बँक ऑफ बडोदा बँकेतून ५० हजार रुपयांची रोख रक्कम काढली आणि ती गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली व बाजारात सामान खरेदी करिता गेले परत आल्यावर खरेदी केलेले सामान गाडीच्या डिक्कीत ठेवले असता डिक्कीत असलेले ५० हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले कुणीतरी गाडीच्या डिक्कीतून ५० हजार रु, बँक पासबुक, व चेक बुक चोरी झाल्याची खात्री पटल्यावर या चोरीची तक्रार बल्लारपूर पोलिसात दाखल केली.

 पोलिसांनी या संदर्भात तक्रार ( गुन्हा ) दाखल करून बँकेतून रोख रक्कम काढतांना सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कुणीतरी येलमुले यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे दिसले बँकेतून बाजारात पाठलाग करतांना दिसून आले व बनावट चाबीच्या आधारावर गाडीच्या डिक्कीतून चोरी गेल्याचे दिसून आले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर तपास केला असता सदर आरोपी चंद्रपूरच्या दिशेने पळाले मात्र ते शहरात पोहोचले नसून बाबूपेठ परिसरात वास्तव्य करीत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला व खबऱ्याच्या माहितीच्या आधारावर सदर आरोपी बाबूपेठ येथील सम्राट चौक येथे राहत असल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी सापळा रचत २१ नोव्हेम्बरला  या प्रकरणातील नानी कृष्णप्पा आर्या वय-२३, नागा रवी बोगी वय-२० रा दोघेही राहणार गणपती घाट, सोलापूर, राजू रामू ईबत्ती वय-४५, रमेश राजू दासर वय-४०, दोघेही राहणार गुलबर्गा, कर्नाटक अशा ४ आरोपींना अटक केली या आरोपीनी यापूर्वी सुध्दा २ गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली पोलिसांनी या आरोपी कडून १ लाख ३० हजार रु रोख व ९२ हजार रु किमतीचे १० मोबाईल संच असा एकूण २ लाख २२ हजार रु चा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणाचा  तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील याच्या नेतृत्वाखाली सपोनि विकास गायकवाड, पोऊनी ज्ञानेन्द्र तिवारी, सलीम शेख, आनंद परचाके, सुधाकर वरघणे, रणविजय ठाकूर, सतिश पाटील, शरद कुडे, संतोष दांडेवार, सत्यनाक कोटनाके,   राकेश बंजारीवाले, श्रीनिवास वाभीटकर, दिलीप आदे, प्रसेनजीत, चंद्रशेखर माथनकर, सिमा पोरते, मेघा आंबेकर, कमल राठोड ई करीत आहे.

Post a Comment

0 Comments