बल्लारपूर पेपरमिलच्या बांबू गेट समोर ( पुटी दिवाल ) वळणावर सिमेंट भरलेला कॅप्सूल ट्रक चढला रस्ता दुभाजकावर : जीवित व वित्त हानी टळली
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज सकाळी ७:३० ते ८:०० वाजताच्या दरम्यान बल्लारपूर शहरात रिमझिम पाऊस सुरू होता त्यामुळे रस्त्यावर वाहतूक तुरळक प्रमाणात असल्यामुळे या अपघातात होणारी जीवित व वित्त हानी टळली.
माणिकगड सिमेंट कम्पनी येथून पुण्यात जाणारा सिमेंटने भरलेला क्र. MH 04 - HY 4673 कॅप्सूल ट्रक बल्लारपूर शहरातील राज्य महामार्गावर बल्लारपूर पेपरमिल बांबू काटागेट जवळील ( पुटी दिवाल ) वळणावरील रस्ता दुभाजकावर चढला अपघाताची माहिती कळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments