बल्लारपूर नगर परिषदेच्या नगरसेवकांची संख्या ३२ वरून ३४ तर स्वीकृत नगरसेवक मिळून ३७ नगरसेवक होणार


बल्लारपूर नगर परिषदेच्या नगरसेवकांची संख्या ३२ वरून ३४ तर स्वीकृत नगरसेवक मिळून ३७ नगरसेवक होणार 

◾बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रभागात 2 ने वाढ होण्याची शक्यता : बल्लारपूरात निवडणुकीची हलचल दिसून येत आहे 


 ◾प्रभाग रचना ३० नोव्हेम्बर पर्यंत होण्याची शक्यता

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर नगर परिषदेचा कार्यकाळ २७ डिसेंम्बरला पूर्ण होत असतांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाच पालन करीत असतांना बल्लारपूरात निवडणुकीची हलचल दिसून येत आहे नगर परिषद बल्लारपूर च्या वतीने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचनेचे काम सुरू असून ३० नोव्हेम्बर पर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई शहर व उपनगरीय विभाग सोडून इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका तील सदस्य संख्येत वाढ करण्याचा अध्यादेशाला मंजुरी दिली व अशा प्रकारचा प्रस्ताव केबिनेट बैठकीत पार पडला याला अनुसरून राज्यातील अ वर्ग आणि ब वर्ग नगर परिषदेच्या सदस्य संख्येत २ ने वाढ होत आहे तर क वर्ग नगर परिषदेच्या सदस्य संख्येत ३ ने वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्राच्या माहितीनुसार अ वर्ग नगर परिषदेची सदस्य संख्या ४० ते ७५ पर्यंत असू शकते, ब वर्ग नगर परिषदेत सदस्य संख्या २५ ते ३७ पर्यंत राहील तर क वर्ग नगरपरिषदेत सदस्य संख्या २० ते २५ पर्यंत असण्याची शक्यता आहे.

        बल्लारपूर नगर परिषदेचा विचार करता सद्यस्थितीत ३२ सदस्य असून या सदस्यसंख्येत २ सदस्यांची वाढ होण्याची शक्यता म्हणजेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २ सदस्यांचा १ प्रभाग यानुसार बल्लारपूर नगर परिषदेत १६ प्रभागावरून १७ प्रभाग होईल तर सदस्य संख्या ३२ वरून ३४ नगरसेवकांची संख्या होईल स्वीकृत नगरसेवक ३ असे एकूण बल्लारपूर नगर परिषदेतील नगरसेवकांची संख्या ३७ होणार आहे. एकूणच राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिलयास येत्या काही दिवसात राज्यभरात निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.



Post a Comment

0 Comments