ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 



ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता महावितरण बाबुपेठ कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन, दुपारी 12.30  वाजता महावितरण सबस्टेशन लोकार्पण समारंभास उपस्थित,  दुपारी 1.30 वाजता हिराई अतिथिगृह येथे आगमन, दुपारी 1.30 ते 3.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव,  दुपारी 3.30 वाजता भटाळी कोळसा पाईप कन्व्हेअर लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, सायंकाळी 5.15 वाजता हिराई अतिथीगृह येथे आगमन तर सायंकाळी 5.30 वाजता नागपूर कडे प्रयाण.


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता महावितरण बाबुपेठ कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन. दुपारी 12.30 वाजता महावितरण कंपनीद्वारा आयोजित सबस्टेशन लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. दुपारी 1.15 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता महानिर्मिती कंपनीद्वारा आयोजित भटाळी कोळसा पाईप कन्वेयर लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. सायंकाळी 5.15 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.


राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 राज्याचे नगरविकास, ऊर्जा ,आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता तळोधी-बाळापुर ता. नागभीड येथे आगमन व साई मंदिर सभागृह येथे आयोजित आदिवासी समाज बांधवांच्या मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे आगमन व नियोजन भवन सभागृह येथे विविध विषयांबाबत आढावा बैठक. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे जनता दरबार.

दुपारी 2.45 वाजता जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे आगमन व जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता भटाळी खुली कोळसा खाण परिसर येथे महानिर्मिती तर्फे आयोजित कोळसा पाईप कन्व्हेअर लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता  हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर कडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर येथे ऊर्जानगर-दुर्गापुर, नगरपरिषद संघर्ष समिती यांच्यासमवेत चर्चा. सायंकाळी 6 वाजता ऊर्जानगर, चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.











Post a Comment

0 Comments