चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाह द्वारे पोस्टकार्ड पाठवा अभियान

 



चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री  असोसिएशन बल्लारशाह द्वारे पोस्टकार्ड पाठवा अभियान

◾आजपासून बल्लारपूरात रेल्वे च्या विविध मागण्यांसाठी पोस्टकार्ड पाठवा अभियान 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाह द्वारे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी तसेच अनेक समस्यांवर उपाययोजना करण्याच्या संदर्भाने बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौक येथे १३ व १४ नोव्हेम्बरला सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत विविध विषयाला अनुसरून पोस्टकार्ड पाठवा अभियान राबविण्यात येत आहे तरी या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील रेल्वे च्या अनेक समस्या वरिष्ठ पातळीवर पोहोचण्यास मदत करावी असे आवाहन चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारपूर च्या वतीने करण्यात आले आहे. यानुसार १) बल्लारशाह ते मुंबई एक विशेष रेल्वे दररोज सायंकाळच्या वेळेस सुरू करावी, २) बल्लारशाह ते भुसावळ फास्ट पेसेंजर सकाळच्या वेळेस सुरू करावी, ३) काजीपेठ ते पुणे रेल्वे आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात यावी, ४) बल्लारशाह ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह  वरून सुरू करण्यात यावी, ५) भाग्यनगरी एक्स्प्रेस चा विस्तार बल्लारशाह पर्यंत करण्यात यावा, ६) चांदाफोर्ट पर्यंत येणाऱ्या गोंदिया पेसेंजर चा बल्लारशाह पर्यंत विस्तार करण्यात यावा अशा अनेक मागण्यांच्या अनुषंगाने  बल्लारपूर शहरात १३ व १४ नोव्हेम्बरला पोस्टकार्ड पाठवा अभियान राबविण्यात येत आहे तरी अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन झेडआरयुसीसी सदस्य श्रीनिवास सुंचूवार, विकास राजूरकर, प्रशांत विघ्नेश्वर, गणेश सैदाने ई नी केले आहे.









Post a Comment

0 Comments