तब्बल ५ हजार महिलांची प्रसूतीसाठी मदत करणाऱ्या पारीचारिकेचा स्वतःच्या प्रसूतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू
( राज्य रिपोर्टर ) वृत्तसेवा : तब्बल ५ हजार महिलांना बाळंतपणासाठी मदत करणाऱ्या परिचारिकेचा स्वतःच्या प्रसूतीनंतर उद्भवलेल्या काही समस्यांमुळे मृत्यू झाला. ज्योती गवळी (३८) असं या परिचारिकेचं नाव आहे . ज्योती गवळी यांनी २ नोव्हेंबर रोजी हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. रविवारी नांदेड येथील रुग्णालयात न्यूमोनिया आणि इतर आजारांवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
"ज्योती गवळी या हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलच्या लेबर रूममध्ये कर्तव्यावर होत्या. त्यांनी गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केले आणि नंतर प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. प्रसूतीनंतर त्या मातृत्व रजेवर जाणार होत्या," असे डॉं गोपाल कदम, हिंगोली सिव्हिल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी पीटीआयला सांगितले.
"गवळी या गेल्या दोन वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होत्या. यापूर्वी त्यांनी सुमारे तीन वर्षे इतर दोन आरोग्य केंद्रांमध्ये काम केले होते. २ नोव्हेंबर रोजी त्यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली. त्याच दिवशी, प्रसुतीदरम्यान काही समस्या उद्भवल्यामुळे त्यांना नांदेडमधील सरकारी वैद्यकीय सुविधेत पाठवण्यात आले. नंतर त्यांना न्यूमोनिया झाला, त्यामुळे नांदेडमधील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले आणि रविवारी त्यांचा मृत्यू झाला. ज्योती गवळी यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात पाच हजार महिलांना प्रसुतीसाठी मदत केली होती," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments