आमदार सुभाष धोटे यांनी घेतला क्षेत्रातील विद्युत व्यवस्थेचा आढावा.

 


आमदार सुभाष धोटे यांनी घेतला क्षेत्रातील विद्युत व्यवस्थेचा आढावा.


राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह राजुरा येथे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील विज वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. 

            राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना तसेच कृषिपंपधारक शेतक-यांना नियमित विज पुरवठा करण्याची जबाबदारी विद्युत विभागावर असून ही जबाबदारी विज वितरण विभागाने इमानेइतबारे पार पाडावी, नियमित विज बिल भरणाऱ्या कृषीपंप धारक शेतकऱ्यांना सुरळीतपणे विज पुरवठा करण्यात यावी, स्थानिक नागरिक, शेतकर्‍यांच्या तक्रारीवर लक्ष केंद्रित करून समस्या सोडवण्यासाठी युध्द स्तरावर काम करण्यात यावे अशा सुचना आमदार सुभाष धोटे यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी कृषीपंप धारक शेतकऱ्यांना शासनाने एकूण थकीत विजबिलात ५० % सुट दिली असून या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे तर दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना सुरू असल्याने विज वितरण विभागाने सुध्दा शेतकऱ्यांना नाहक त्रास देणे थांबवावे अशा सुचना अधिकाऱ्यांनाही दिल्या आहेत. 

           या प्रसंगी बल्लारपुर विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश ठावरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता महेश तेलंग, राजुरा चे उप कार्यकारी अभियंता श्रीनिवास बाडगू, गोंडपिपरी चे  अरविंद कातकर, गडचांदूर चे अतुल इंदुरकर, जिवती चे ढोकने आदि अधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments