इंडियन मानवाधिकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची आढावा बैठक

 



इंडियन मानवाधिकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची आढावा बैठक

◾मानवाधिकार : मानवी हक्काचे संरक्षण कवच,राज्याध्यक्ष नरवाडे यांचे प्रतिपादन

 राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : मानवाधिकार मानव हक्काचे संरक्षण कवच आहे प्रत्येक माणसाला असणारे निसर्गदत्त मूलभूत अधिकार हे अधिकार त्याला जन्मतःच मिळतात पण तरीही त्यावर आक्रमक होत असते त्यामुळेच ते अबाधित राहण्यासाठी प्रयत्नांशी,सतत जागरूक राहण्याची आवश्यकता असते असे प्रतिपादन इंडियन मानवाधिकार असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पांडुरंग नरवाडे यांनी केले

        इंडियन मानवाधिकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची आढावा बैठक दि.२० रोजी नागपूर येथिल इंडिया पीस सेंटर येथे पार पडली त्याप्रसंगी नरवाडे  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते सर्वप्रथम परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज,सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली

        याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक राज्य संघटक हेमंत उंदिरवाडे होते प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष बंडू मडावी, डॉ. योगेश मूनेश्वर,मृणालिनी जनबंधु  स्वागताध्यक्ष वैशाली चावरे हे होते युनिव्हर्सल डिक्लेरेशन आफ ह्यूमन राईटस आणि राज्यघटना या दोन्हीमुळे आपल्या मानावाधिकाराचा पाया घट्ट झाला असल्याचे मडावी यांनी सांगितले तर,स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्येही आपण अंगिकारले असल्याचे उंदिरावाडे यांनी सांगितले डॉ. योगेश मूनेश्वर, मृणालिनी जनबंधु यांनी सुध्दा मानवाधिकाराची कर्तव्य सांगितली यावेळी जिल्हाध्यक्ष वैशाली चवरे, मनोज आत्राम, प्रिया मेश्राम, संदेश कालबांधे,भगवान गायकवाड,राकेश कलेगुरवार,अनिल गिरमीला आदींसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष वैशाली चवरे यांनी केले तर,आभार प्रिया मेश्राम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments