बनावट लग्न करून देऊन पैसे घेऊन पसार होणाऱ्या टोळीला केली अटक
◾बल्लारपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : एका घरगुती भांडणाचा विसापूर गावात चौकशी करण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे बनावट लग्न करण्याचे आमिष देऊन पैसे घेऊन पसार होणाऱ्या टोळीतील ४ व्यक्तींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. याविषयीची सविस्तर माहिती अशी की, विसापूर येथे वास्तव्यास असणारे ईश्वर कुळमेथे यांची मुलगी नंदिनी हिचे लग्न राजस्थान येथील निवासी असलेले समय सिंग यांचेशी झाला नंदिनीचा संसार सुखात सुरू असताना नंदिनीचा दीर सुध्दा लग्नाच्या योग्य असल्याने मुलीच्या शोधात होता त्यामुळे दिवाळीच्या सणाला नंदिनी ही तिच्या दिरासोबत विसापूर या आपल्या गावात म्हणजे माहेरी आली दि.२५/११/२०२१ ला ईश्वर कुळमेथे यांनी बँक ऑफ बडोदा येथून त्यांचे जावई समय सिंग यांनी पाठविलेले पैसे काढले असता या प्रकरणातील आरोपी रामटेके उर्फ सोनू बोरकर फिर्यादी असलेल्या ईश्वर कूळमेथे यास पैसे कशासाठी काढले विचारले असता फिर्यादी ने मुलीच्या दिराचे लग्न करावयाचे आहे असे सांगितले तेव्हा बोरकर यांनी लग्नासाठी एक मुलगी असून ती चंद्रपूरला तिच्या मावशी सोबत रहात असल्याची बतावणी केली तसेच सोनू बोरकर यांनी त्याचा साथीदार व्यंकटेश रांधाडी याला घेऊन विसापूर येथे फिर्यादीच्या घरी जावून मुलीची मावशी बिमार आहे अशी बतावणी करून तिला उपचारासाठी ७५,०००/- रुपयांची गरज आहे त्यामुळं आधी पैसे द्या नंतर लग्न होईल असे सांगून फिर्यादी कडून ७५,०००/- रुपये घेवून लागलीच प्रकरणातील तिसरी आरोपी प्रेमलता उमरे उर्फ सिमा बरमन हिला विसापूर येथे आणून तिचे विसापूर या गावात आणून लग्न लावून दिले सदर लग्नामध्ये यातील महिला आरोपी किरण उर्फ ज्योत्स्ना सुखदेवें ही आरोपी प्रेमलताची मावशी म्हणून हजर होती तसेच व्यंकटेश रांधाडी हा काका म्हणून हजर होता अशाप्रकारे दि.२६/११/२०२१ रोजी विसापूर येथे सायंकाळी लग्न लागले यानंतर प्रेमलता उमरे ही फिरायला जायचं असल्याचं कारण सांगून बाहेर पळाली तेव्हा एक मोटरसायकल तिला घेण्यासाठी बाहेर उभी होती प्रेमलता ही पळून जाण्याचा तयारीत असतांना राजेंदर सिंग यांनी प्रेमलता ला पळून जात असतांना पकडून आरडाओरडा केला व यावरून सर्व प्रकरणाचे गुपित उघडे पडले.
या प्रकरणात बल्लारपूर पोलीस स्टेशनला कलम ४२०, ३४ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची कारवाई मा.अरविंद साळवे पोलीस अधीक्षक, मा.अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक, मा.राजा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या नेतृत्वात सपोनि प्राची दशरथ राजूरकर, सपोनि विकास गायकवाड, गणेश तोटेवार, विलास खरात, ज्योती आकातोटेवार यांनी केली असून या प्रकरणातील टोळीतील ४ आरोपीना अटक केली असून यात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही यापुढील तपास सपोनि प्राची राजूरकर करीत आहे.
0 Comments