योग व नॅचरोपॅथी मधे डॉ. शिल्पा चन्ने यांना आयुष कोरोना योद्धा अवॉर्ड

 



योग व नॅचरोपॅथी मधे डॉ. शिल्पा चन्ने यांना आयुष कोरोना योद्धा अवॉर्ड


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : 18 नोव्हेंबर 1945 ई. मधे महात्मा गांधी यानी ऑल इंडिया नेचर क्योर फांउडेशन ट्रस्ट ची स्थापना केली म्हणून  प्राकृतिक चिकित्सा दिवस या दिनी साजरा केल्या जातो. आयुष भारत तर्फे चौथे 2021 प्राकृतिक चिकित्सा दिवस नागपूर ला साजरे केले गेले.

या वेळी विदर्भातून चंद्रपूर च्या डॉ. शिल्पा चन्ने यांची निवड करण्यात आली. कोरोना  महामारी मधे प्राकृतिक योग च्या माध्यमातून डॉ. शिल्पा चन्ने यांनी लोकांना  नवीन ऊर्जा दिली जन्म आणि मृत्युच्या परे जाण्याचे कौशल्य पेशंट ला शिकविले.

कठीण परिस्थिती मधे पण विचार आणि प्राण शक्ती वर कार्य करून   योग्य रसायन घेऊन कोरोना आजारातून बरे केले आहे.समोर पुन्हा या चांगल्या गोष्टीचा प्रसार झाला पाहिजे यासाठी देश- विदेशातल्या लोकांसाठी ऑनलाईन प्लाटफॉर्म उपलब्ध केले आहे आणि रुग्ण बरे होत आहे.

युनानी ,नॅचरोपॅथी ,आयुर्वेद ,योग ,सिध्दा , होमियोपॅथी, एक्युपंचर , न्युरोथेरपी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना आयुष भारत सन्मानित करतो. जगात 22 कंट्री मधे आयुष इंटरनॅशनल काम करत आहे या कार्यक्रमा साठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना प्रोटोकॉल नुसार शुभेच्छा दिल्या शेवटी प्रेसिडेंट AIMA( Aayush International Medical Association) डॉ. विनोद धोबडे  सर  यांनी सर्व सात पॅथी मधले डॉक्टर चे  आभार मानले.








Post a Comment

0 Comments