महिला सक्षमीकरणात गोल्डन अर्थ शोषल वेलफेअर सोसायटी चे याेगदान कौतुकास्पद - प्रा.महेश पानसे

 


महिला सक्षमीकरणात गोल्डन अर्थ शोषल वेलफेअर सोसायटी चे याेगदान कौतुकास्पद - प्रा.महेश पानसे

◾ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे चर्चा सत्र आयाेजीत

नागभिड ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर  जिल्हयातील ग्रामिण भागातील महिलांना कुटिरोद्योगातून सक्षमीकरणाची वाट दाखविण्याचा विडा  गोल्डन अर्थ शोषल वेलफेअर सोसायटी तर्फे उचलण्याचे महतकार्य कौतुकास्पद असून या संधीचा लाभ उचलून  नागभीड तालुक्यातील महिलांनी ग्रामिण अथँविकासात हातभार लावावा असेआवाहन राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष  प्रा. महेश पानसे यांनी गाेल्डन अर्थ साेशल वेलफेअर तर्फे आयाेजीत मार्गदर्शन व चर्चा  सत्रात केले. या सत्राचे अध्यक्षस्थानी सरपंचा शमिंलाताई रामटेके तर सहआयाेजक वेलफेअर साेसायटीचे जिल्हा समन्मयक हाेमदेवजी मेश्राम हाेते.                         

 संरपंच,सचिव,आशावर्कर व गावातील महिलांना नवेगांव पांडव येथे चालु करत असलेल्या अगरबत्ती व मशरुम पापड व ईतर गृह उद्योगाविषयी या चर्चा सत्रात परिपुर्ण मार्गदर्शन करण्यात आले व परिपुर्ण माहिती देण्यात आली.गावस्तरावर या कौतकास्पद उपक़माचे नियाेजन करण्यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याकरीता नवेगाव पांडव चे विस्तार अधिकारी नरेन्द्र क्षिरसागर,तलाठी ज्ञानेश्वर मगर यावेळी उपस्थित हाेते.

            या चर्चा सत्रात वैशाली बोबाटे,जयमाला पांडव आशावर्कर,शेवंता उरकुडे,दिक्षा सुर्यवंशी फिल्ड आँफिसर,सोनु खापर्डे कोतवाल,गावातील प्रतीष्ठीत नागरीक व ग्राम पंचायत कर्मचारी सहभागी होते.








Post a Comment

0 Comments