बल्लारपूर ओपन कास्ट मध्ये असंघटित कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपनी व ठेकेदाराला राजु झोडे यांचा दणका

 



बल्लारपूर ओपन कास्ट मध्ये असंघटित कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपनी व ठेकेदाराला राजु झोडे यांचा दणका

◾असंघटित कामगारांना प्रताडीत व धोखाधाडी करणाऱ्या कंपनीविरोधात उलगुलान कामगार संघटना आक्रमक


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर एरिया अंतर्गत बल्लारपूर ओपन कास्ट माईन मध्ये मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार काम करत आहेत. कंपनी व ठेकेदार कामगारांचे आर्थिक शोषण करून त्यांना मिनिमम वेज न देता कामगारांना बारा बारा तास काम करूनही अल्प प्रमाणात वेतन दिल्या जाते. कामगार आपल्या न्याय हक्कासाठी बोलला तर त्यांना मारझोड केल्या जाते. त्यांना धमकावून त्यांचे हक्काचे मजुरी दिल्या जात नाही. याची तक्रार असंघटित कामगारांनी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्याकडे केली. राजू झोडे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सब एरिया मॅनेजर यांच्या कार्यालयासमोर कामगारांना घेऊन ठिय्या आंदोलन केले व जेथपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे ठणकावले. सब एरिया मॅनेजर यांनी लगेच आश्वासन दिले की, दोन तासाच्या आत कामगारांना संपूर्ण वेतन दिल्या जाईल व सन्मानपूर्व कामगारांना त्यांच्या गावाला सोडण्यात येईल.

     खाजगी ठेकेदार डब्ल्यूसीएल मध्ये कोळसा उत्खननासाठी व माती उत्खनन करण्यासाठी बंधवा कामगार म्हणून बाहेर राज्यातून आणतात. या कामगारांना आणल्यानंतर अल्प मजुरीवर काम करून त्यांना मारझोड करणे, शिवीगाळ करणे माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार करतात. यावर डब्ल्यूसीएल मॅनेजमेंटही काही बोलत नाही.डब्ल्यूसिएल चे मॅनेजमेंट ठेकेदाराच्या बाजूने राहून कामगारांचे शोषण करण्यास मदत करतात त्यामुळेच असे प्रकार घडत असतात असा आरोप उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केला. कुठेतरी यावर आळा बसला पाहिजे व कामगारांना न्याय मिळाला पाहिजे याकरिता जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.कामगारांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून दिल्याबद्दल कामगारांनी राजू झोडे व उलगुलान संघटनेचे कार्यकर्ता व पदाधिकारी यांचे आभार मानले.








Post a Comment

0 Comments