राजुरा तहसिल अंतर्गत टेंबुरवाही येथे आमदार सुभाष धोटे व माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण

 



राजुरा तहसिल अंतर्गत टेंबुरवाही येथे आमदार सुभाष धोटे व माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : आदिवासी गोंड समाज मंडळ, टेंबुरवाही यांच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.सुभाष धोटे व माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच आदिवासी बांधवांचे समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

          या प्रसंगी माजी आमदार ॲड. संजय धोटे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरणुले, माजी सरपंच रत्नमाला गेडाम, उपसरपंच चेतन जयपुरकर, दिलीप वांढरे, श्यामराव कोटनाके, अॅड. मारोती कुरवटकर, आदिवासी गोंड समाज मंडळाचे अध्यक्ष गुणवंत कुडसंगे, सचिव पांडुरंग सिडाम, भाष्कर धनवलकर, मनोहर रणदिवे, शंभू गेडाम, संतोष कुडसंगे, रोहन गेडाम, अर्जुन अलगमकर, सुधाकर अमृतकर, नथ्थू डोंगरे जलापती कोडापे, दशरथ चापले, बाळू ठाकरे, मंगेश जगताप यासह स्थानिक आदिवासी बांधव, गावकरी उपस्थीत होते.









 

Post a Comment

0 Comments