वेकोली अंतर्गत सुरु असलेल्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या - आ. किशोर जोरगेवार


वेकोली अंतर्गत सुरु असलेल्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या - आ. किशोर जोरगेवार

◾वेकोलीच्या अधिका-यांशी बैठक घेत केल्या सूचना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हात वेकोलीचे जाळे पसरले असून वेकोली अतंर्गत सुरु असलेल्या लघू व मध्यम उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीत होत आहे. मात्र सदर उद्योग बाहेरील कामगारांना रोजगार देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यामूळे सदर उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्याच्या दिशेने उपाययोजना करण्यासाठी आठ दिवसात सदर उद्योगांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजीत करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर वेकोली एरियाचे क्षेत्रीय महाप्रबंधक मोहम्मद साबीर यांना दिल्या आहे.

       रोजगारासह ईतर महत्वाचे विषयासांसाठी आज रविवारी वेकोली वसाहत शक्तीनगर येथील विश्रामगृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलीच्या अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत सदर सुचना देण्यात आल्या आहे. या बैठकीला वेकोली चंद्रपूर एरियाचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक अरुण लाखे, लक्ष्मीकांत मोहपात्रा, नागेंद्र कुमार, जी. डी. खोब्रागडे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

       वेकोली अंतर्गत अनेक लघू व मध्यम उद्योग सुरु आहे. मात्र या उद्योगांध्ये स्थानिकांना डावलून बाहेरच्या कामगारांना काम दिल्या आहे. परिणामी स्थानिक भुमिपूत्रांना हक्काच्या रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. हि चिंतेची बाब असून यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी सदर सर्व उद्योजगांच्या प्रतिनिधींची आठ दिवसात संयुक्त बैठक बोलविण्याच्या सुचना आ. जोरगेवार यांनी केल्या आहे. वेकोली प्रशासनानेही सदर सुचना मान्य केल्या आहे.

        कोणतीही पूर्व सूचना न देता लालपेट परिसरात वेकोलीच्या वतीने घरांचे सर्व्हे केल्या जात आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता वेकोलीने सदर सर्व्हे मागची भुमिका स्पष्ट करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. डीओसी, पीओसी आणि भटाडी प्रकल्पालगत असलेल्या मार्गाच्या दोन्ही बाजूला झाडी झुडपी उगवली आहे. त्यामूळे येथे जंगली हिंसक प्राण्यांचा वावर वाढला आहे. ही बाब लक्षात घेता तात्काळ ही झाडी झूडपी काढण्यात यावी, सि.एस.आर. फंडातून वेकोली अंतर्गत येणा-या रस्त्यांची डागदुजी करण्यात यावी आवश्यक तिथे नवीन मार्ग तयार करण्यात यावा, वेकोली वसाहतीत नियमीत स्वच्छता ठेवण्यात यावी, वृक्षांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड उपलब्घ करुन देण्यात यावे, पाईप लाईनचे काम पुर्ण करुन वेकोली वसाहतीत शुध्द पाणी पूरवठा करण्यात यावा, चंद्रपूर परिसरात वॉटर कुलर आणि प्युरिफायर प्लांट उपलब्ध करून देण्यात यावा आदि सुचनाही या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोली प्रशासनाला केल्या आहेत. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक, कलाकार मल्लाराप, पंकज गुप्ता, राशेद हुसैन, सूर्या अडबाले, संजय कासर्लावार, संतोष कुरा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या उपस्थिती होती.










Post a Comment

0 Comments