न.प.बल्लारपूर शहराला स्वच्छताविषयक विविध उपक्रमात कचरा मुक्त शहर म्हणुन थ्री ( 3 ) स्टार रॅकींग प्राप्त

 


न.प.बल्लारपूर शहराला स्वच्छताविषयक विविध उपक्रमात कचरा मुक्त शहर म्हणुन  थ्री ( 3 ) स्टार रॅकींग प्राप्त

◾हा सन्मान मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातुन झालेला शहराचा विकास व शहरातील समस्त जनतेच्या स्वच्छते विषयी असलेल्या जागरूकतेचे प्रमाण - हरिश शर्मा,नगराध्यक्ष

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्र सरकारचा स्वच्छ संर्वेक्षण 2021 उपक्रमा अंतर्गत देशातील 4383 महानगरपालिका व नगर परिषदे पैकी143 थ्री स्टार रॅकींग मध्ये मानांकन करण्यात आले.यात बल्लारपूर नगर परिषदेने समावेश करित स्वच्छता विषयक उपक्रमात कचरामुक्त शहर अंतर्गत थ्री ( 3 )  स्टार मानांकन प्राप्त केले.या निमित्य भारत सरकार आयोजित स्वच्छतेचा महोत्सव स्वच्छ सर्वेक्षण 2021च्या पुरस्काराचे वितरण शनिवारी दिनांक 20/11/2021रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद व गृह निर्माण व शहर विकास मंत्री मा.हरदीप सिंह पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न   झाला.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बल्लारपूर नगर परिषदने कचरामुक्त शहर म्हणून थ्री स्टार रँकिंग मिळवल्याबद्दल केंद्र शासनाचे नगरविकास सचिव श्री. दुर्गाशंकरजी मिश्रा यांच्या हस्ते नगराध्यक्ष मा.श्री.हरीश शर्मा व मुख्याधिकारी मा.श्री.विजय सरनाईक सर यांनी पारितोषिक स्वीकारले. याप्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की माजी अर्थ,नियोजन वन मंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नाने विकासा करिता केलेल्या सहकार्या मुळे बल्लारपुर शहराचा कायाकल्प झाला.यामुळे शहरातील जनतेस स्वच्छतेची जागरुकते करिता प्रेरणा मिळाली.जनतेची जागरुकता व स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने शहरास हा सन्मान प्राप्त झाला करिता शहरातील  सर्व जनतेचे सर्व  न.प.सदस्यांचे,व्यापारी बांधवांचे,नगरपरिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे,नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच विशेष करून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments