बल्लारपूर नगर परिषदेला स्वच्छता सर्वेक्षण 2021 अंतर्गत थ्री स्टार रँकिंग मिळाल्याबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अभिनंदनस्पर कार्यक्रमाचे आयोजन

 



बल्लारपूर नगर परिषदेला  स्वच्छता  सर्वेक्षण  2021 अंतर्गत  थ्री स्टार रँकिंग  मिळाल्याबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अभिनंदनस्पर कार्यक्रमाचे आयोजन

◾हा सन्मान स्वच्छता कर्मचाऱ्यांना समर्पित - हरीश शर्मा  नगराध्यक्ष

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण 2021 अंतर्गत बल्लारपुर नगरपालिकेला थ्री स्टार रँकिंग प्राप्त झाले करिता  या सन्मानाचे  खरे मानकरी  स्वच्छता कर्मचा-र्यांचा अभिनंदनस्पर कार्यक्रम नाट्यगृह  बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आला.याप्रसंगी  नगराध्यक्ष  हरीश शर्मा यांनी  मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,देशातील संपुर्ण 4383  महानगरपालिका व नगर परिषद  पैकी 143 नगरपालिकांना हा सन्मान प्राप्त झाले.त्यापैकी बल्लारपूर शहर हे एक आहे.हा सन्मान  प्राप्त होणे शहरातील  प्रत्येक नागरिकांकरिता  गौरवाचा क्षण आहे. हा सन्मान बल्लारपुरातील  जनता जनार्दनाच्या  स्वच्छतेबद्दल असलेली जागृकता तसेच  स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अथक  परिश्रमाचे फळ आहे.करिता या सन्मानाचे मानकरी प्रामुख्याने  स्वच्छता कर्मचारी यांना हा सन्मान  मी समर्पित करतो व त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.असे भावनिक मनोगत यावेळी व्यक्त करित पुढे देखील आपले शहर  सुंदर व स्वच्छ  ठेवीत 2022 च्या  सर्वेक्षणात बल्लारपूर शहराला  फाइव स्टार रँकिंग प्राप्त होईल अश्या प्रकारे शहर स्वच्छ ठेवण्यास सर्वांनी प्रयत्न करावे.अशी आग्रही साद यावेळी नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांनी घातली. या कार्यक्रमास प्रामुख्याने  मा.चंदनभैया चंदेल,माझी अध्यक्ष वन विकास महामंडळ (म.रा) हे उपस्थित होते.तसेच नगर परिषदेचे उप.मुख्यधिकारी श्री.कातकर सर स्वच्छता सभापती श्री.येलय्या दासरफ,पाणीपुरवठा सभापती श्री.कमलेश शुक्ला, तसेच नगरपरिषद चे श्री खामनकर सर श्री नरेश गेडाम श्री शितिल हाडके उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन शब्बीर अल्ली यांनी केले.


Post a Comment

0 Comments