एनसीसी वार्षिक शिबिरात 126 छात्र सैनिकांचा सहभाग : राष्ट्र प्रथम

 



एनसीसी  वार्षिक शिबिरात 126 छात्र सैनिकांचा सहभाग : राष्ट्र प्रथम

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : स्थानिक गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर येथे गुरुनानक विज्ञान महाविद्यालय व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमनाने व 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा द्वारा एनसीसी कॅडेट करीता वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एनसीसी 'सी' प्रमाणपत्र व एनसीसी 'बी' प्रमाणपत्राचे एकूण 126 विद्यार्थी कॅडेट्स नी सहभाग घेतला.

एनसीसी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कॅम्प कमांडंट व ऍडम ऑफिसर लेफ्ट. कर्नल गौस बॅग यांनी केले. तसेच एनसीसी नागपुर ग्रुपचे कमांडर ग्रुप कॅप्टन एम. कलीम, यांनी या प्रशिक्षण शिबिराला विशेष भेट दिली ज्यात त्यांनी शिबिरार्थीना व्यतिगत स्वास्थ आणि स्वछता वर मार्गदर्शन करतांना युवा स्वस्थ तर राष्ट्र स्वस्थ हा संदेश दिला.

21 महाराष्ट्र चे कंमांडिंग ऑफिसर कर्नल डी वि भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्प कंमांडन्ट ऍडम ऑफिसर लेफ्ट कर्नल गौस बेग,  लेफ्ट डॉ. एम सी शर्मा, केअरटेकर ऑफिसर प्राध्यापक योगेश टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सीएटीसी  617 आणि 618 प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. 

शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर, गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर, थापर जुनियर कॉलेज बल्लारपूर, आणि एस.बी. कॉलेज अहेरी येथील छात्र सैनिकांनी भाग घेतला. शिबिरात सैनिकी प्रशिक्षकांनी कॅडेट्स ला ड्रील, शस्त्र प्रशिक्षण, युद्धकौशल्य, युद्धतंत्र, सन्मान गार्डचे प्रशिक्षण दिले. लेफ्ट. डॉ.एम सी शर्मा यांनी आपत्ती निवारण,  व्यक्तिगत स्वास्थ आणि स्वछता, आणि सैन्य इतिहास  या विषयावर मार्गदर्शन केले. केअरटेकर ऑफिसर योगेश टेकाडे यांनी सामुदायिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी 21 महाराष्ट्र बटालियन  चे व्यतिगत प्रशिक्षण कर्मचारी सुभेदार भुपेंद्रसिंग, सुभेदार शंतनू दास, सुभेदार ट्विंकल सिंग, सुभेदार नरपत सिंग, हवलदार संतोष लोखंडे, हवालदार राम तपासे,  हवालदार किशोर कुमार आणि हवालदार सुनील  हैसल आदींनी परिश्रम घेतले.









Post a Comment

0 Comments