जनसेवेत आयुष्य खर्च होत आहे हे माझे सौभाग्य - आमदार सुभाष धोटे

 




जनसेवेत आयुष्य खर्च होत आहे हे माझे सौभाग्य - आमदार सुभाष धोटे

🔸आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन चाकी  स्वयंचलित सायकलचे वितरण

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑक्टोबर २०२१ ला इन्फंट कान्व्हेंट राजुरा येथे सकाळी ११ :३० वाजता अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने आमदार सुभाष धोटे यांचा नागरी सत्कार व विकलांग व्यक्तींना तीन चाकी स्वयंमचलीत सायकलचे वितरण करण्यात आले.      

           या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपण सक्रिय सहभाग घेतला आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे, मदत करण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. जनसेवेत आयुष्य खर्च होत आहे हे माझे सौभाग्य असून क्षेत्रातील गोरगरीब जनतेची अविरत सेवा आपण यापुढेही करीत राहू अशी ग्वाही दिली. 

           या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे होते, उद्घाटक महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई डांगे, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष अरूण धोटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामु तिवारी, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, करीमभाई, माकोडेजी, ॲड. मेघा भालके, सौ. शुभांगीताई धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जेष्ठ नेते हमीदभाई, प्रमोद बोरीकर, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, कविता उपरे, दिनकर कर्णेवार, अशोकराव देशपांडे, जि प सदस्य मेघाताई नलगे, उपसभापती मंगेश गुरणुले, प.स. सदस्य  कुंदाताई जेणेकर, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, नगरसेवक हरजीत सिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहणे, साधना भाके, वज्रमाला बतकमवार, दीपा करमरकर, शारदा टिपले, अर्चना गर्गेलवार, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर,  राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, सय्यद सकावत अली, एड. चंद्रशेखर चांदेकर, हरिचंद्र जुनघरी, शिवराम लांडे, सर्वानंद वाघमारे, अविनाश जेनेकर, संतोष इंदुरवार, चंद्रकात धोटे, रामभाऊ ढुमने, लहू चहारे, रामभाऊ देवईकर, कवडू सातपुते, श्यामभाऊ कोटनाके, जंगु पाटील मडावी, गजेंद्र ढवस, अमोल घटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, राजु पिंपळशेंडे, राजाराम येल्ला, पंढरी चंन्ने, विकास देवाडकर, इर्शाद शेख, धनराज चिंचोलकर, राजकुमार ठाकूर, प्रणय लांडे, शाहनवाज कुरेशी, आकाश मावलीकर, कोमल पुसाटे, जगदीश बुटले, संदीप घोटेकर, सय्यद साबीर, माजी सभापती निर्मला कुडमेथे, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर. नंदाताई गेडाम, पुनम गिरसावळे, मंगला हांडे, योगिता मटाले, संगीता धोटे, यासह संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले, संचालन व आभार प्रदर्शन मेघा धोटे यांनी केले.



Post a Comment

0 Comments