बल्लारशाह रेल्वे लाईन वर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला

 


बल्लारशाह रेल्वे लाईन वर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला 

◾मृतदेहाची ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे बल्लारपूर पोलिसांचे आवाहन 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : दिनांक ०७/१०/२०२१ रोजी रात्री ०९/०० वाच्या सुमारास पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे रेल्वे स्टेशन उपप्रबंधक श्री. नंदनवार यांनी लिखीत रिपोर्ट दिली की, एक अनोळखी पुरूष इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष हा गोल पुलिया ते विसापुर जाणारे रेल्वे ट्रॅक चे पो.क्र ८८८बी/२७ऐ जवळ पडलेला आहे, सदर माहिती वरून पोलीस निरीक्षक श्री.उमेश पाटील यांच्या आदेशाने पो.उप.नि तिवारी यांनी पोलीस स्टाफ सह घटनास्थळी जाऊन रेल्वे ट्रॅक जवळ पडलेल्या अनोळखी पुरूषास ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविले असता डाक्टरानीं तपासुन मरण पावल्याचे  सांगितले यावरून पो.स्टे बल्लारपूर ला अक्समात मॄत्यु क्र.८२/२०२१ कलम १७४ सी.आर.पी.सी नोंद असुन तपास सुरू आहे.

अनोळखी पुरुष याचे अंगावर काळी,लाल,ग्रे कलर ची फुल टी-शर्ट व निळ्या रंगाचा पेन्ट होता व त्याचे उजवे हातावर '  सपना आई लव यु,मे तुम से प्यार करता हुं ' असे गोंदलेले आहेत.

सदर व्यक्तिस कुणी ओळखत असल्यास पो. स्टे.बल्लारपुर येथील पो.नि.श्री उमेश पाटील यांचे मो.क्र.९८२२५११७५१ ,पो.उप.नि तिवारी यांचे मो.क्र.७९७२७७३६०१ यावर कळवावे. किंवा पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.




Post a Comment

0 Comments