संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे मागील ५ महिन्यापासूनचे थकीत अनुदान अदा करा

 


संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे मागील ५ महिन्यापासूनचे थकीत अनुदान अदा करा

◾यंग चांदा ब्रिगेडची मागणी, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार यांना निवेदन

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेची मागील 5 महिण्यांपासून थकीत असलेली रक्कम तात्काळ लाभार्थांना अदा करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचे चंद्रपूर ग्रामीणचे नायब तहसीलदार राजू ढांडे तसेच शहर विभागाच्या नायब तहसीलदार जगताप यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आशा देशमूख, दुर्गा वैरागडे, विमल कातकर, पूष्पा कुडे, शशीकला नैताम आदिंची उपस्थिती होती.
  संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेची रक्कम गेल्या ५ महिन्यापासून योजना धारकांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. परिणामी त्यांची परीस्थिती हलाकीची झालेली आहे. अनेक कुटुंब केवळ या योजनेच्या अनुदानातून प्राप्त होणार्या रकमेपासून उदरनिर्वाह चालवितात त्यांच्या दैनदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना या अनुदाना व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नाही. तसेच पुढील दिवस हे सणासुदीचे असल्यामुळे लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त होणे अतिशय गरजेचे आहे. त्यामूळे याची गंभिर दखल घेत सदर लाभार्थांना  तात्काळ प्रलंबीत अनूदान देण्यात यावे अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार यांना करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments