बल्लारपूरात शहरात महाराष्ट्र बंद दरम्यान दुकान बंद करण्यावरून वाद



बल्लारपूरात शहरात महाराष्ट्र बंद दरम्यान दुकान बंद करण्यावरून वाद 

 ◾वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : उत्तरप्रदेशातील लखीमपूर ( खैरी ) येथील शेतकरी आंदोलन करीत असताना ३ ऑक्टोम्बर रोजी केंद्रीय मंत्री यांच्या नातवाईकाने बेजबाबदार वाहन चालवून आंदोलकांना वाहणाखाली चिरडले असल्याची घटना घडली या घटनेत ८ निष्पाप शेतकरी यांना आपला जीव गमवावा लागला या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे दृष्टीने देशभरातील विरोधी पक्षांनी आंदोलन केली या अंतर्गत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आज ११ ऑक्टोम्बर २०२१ ला महाराष्ट्र बंद पुकारला आहे या अनुषणगाने बल्लारपूर शहरात महाविकास आघाडीतील घटक पक्ष  ( शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ) यांनी शहरातील जुने बसस्थानक ते पेपरमिल काटा गेट पर्यंत रॅली काढून नागरिकांना बंद चे आवाहन केले यामुळं बल्लारपूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बंद यशस्वी ठरला असल्याची माहिती महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या स्थानिक स्तरावरील पदाधिकारी यांनी दिली आहे या बंद दरम्यान काँगेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

           दरम्यान बल्लारपूर शहरात दुकान बंद करण्यावरून वस्ती विभागातील गांधी चौक परिसरात शाब्दिक वाद झाला एका अज्ञात व्यक्तीने बंद समर्थक आंदोलकांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलीस बांधवांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला एकूणच बल्लारपूर शहरात महाराष्ट्र बंद हा शांततेत पार पडला असून व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवून बंद ला समर्थन दिले तर सकाळी १०:०० नंतर पेट्रोल पंप ही बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त राखण्यात आला होता त्यामुळं कुठेही अनुचित घटना घडली नाही.




Post a Comment

0 Comments