लैंगिक अत्याचार प्रकरणी शेकडो आदिवासी बांधवांचा मोर्चा बल्लारपूर उपविभागीय कार्यालयावर धडकला


लैंगिक अत्याचार प्रकरणी शेकडो आदिवासी बांधवांचा मोर्चा बल्लारपूर उपविभागीय कार्यालयावर धडकला 

◾उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत शासनाला निवेदन पीडितांना त्वरित न्याय देण्याची मागणी तर आरोपीला कठोर कारवाई करण्याची मागणी

◾आठ किलोमीटर पैदल मूक मोर्चा हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थिती 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : तालुक्यातील केम तुकूम येथील जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी वरील झालेल्या  लैंगिक शोषण व अश्लील कृत्याच्या घटनेच्या निषेधार्थ केम तुकुंम ते बल्लारपुर उपविभागीय कार्यालय आठ किलोमीटर पैदल मूक मोर्चा हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थिती काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा आदिवासी आघाडीचे ग्रामीण शहर जिल्हा चंद्रपूर हरीश गेडाम, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बद्दलवार, पंचायत समिती सभापती इंदिरा पीपरे,उपसभापती सोमेश्वर पद्मगिरवार किशोर पंदीलवार पंचायत समिती सदस्य गोविंदा पोडे ,रमेश पीपरे,राजू बुद्दलवार,मोरेश्वर उडिसें तसेच जिल्ह्यातील दहा आदिवासी संघटनांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.तत्पूर्वी बल्लारशाह येथील गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांचे समाधी ला पुष्प अर्पण करण्यात येऊन सभेचे आयोजन करण्यात आले.त्यात हरीश गेडाम,वैशाली बुद्दलवार,व आदिवासी नेत्यांची भाषणे झाली.  ४ ऑक्टोंबर २०२१ ला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील केम तुकुं (बामणी) जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने या शाळेतील सात अल्पवयीन गरीब आदिवासी विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण व अश्लील कृत्य केल्याची बाब उघडकीस आल्याने या मुख्याध्यापकास अटक करून  पोलीस स्टेशन बदलापूर येथे अपघात क्रमांक १०२२/२१ कलम ३७६(अ ब) ,कलम ३७६(२)(एएफ) सहकलम ४,६,८,१२ पोस्को अधिनियम २०१२अन्वये दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ चा गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेमुळे आदिवासी समाजाचे मन व भावना सुन्न झालेल्या असून अशा प्रकारच्या अनेक घटना वारंवार विशेषता आदिवासी समाजावर घडत असल्याचे दिसून येत आहे. परंतु या समाजाला न्याय मिळण्यास अनेक वर्षांची वाट पाहावी लागत असल्यामुळे महिलांचा सन्मान करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात आदिवासी अल्पवयीन मुलींना असुरक्षितता वाटत आहे .त्यामुळे या घटनेची गंभीर  दखल शासनाने प्रशासनाने व समाज माध्यमाने घेण्याकरिता त्याप्रमाणे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम समाजकंटकांना जरब बसविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव आदिवासी सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने १८ ऑक्टोबर २०२१ ला मौजा केम तुकुम ते  उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांचे कार्यालयापर्यंत शेकडोंच्या संख्येने समाजाला न्याय व शासनाची दाद  मिळवण्यासाठी शांततेत मूक मोर्च्याचे आयोजन करून मागण्या करण्यात आलेल्या आहेत .या घटनेच्या न्यायालयीन प्रक्रियेत शासनातर्फे नामांकित वकिलाची नियुक्ती करणे .सदर घटना तीव्र न्यायालयात ठेवण्यात येऊन तात्काळ न्यायनिवाडा करावा. कायद्याअंतर्गत पीडितांना आर्थिक मदत देण्यात यावी. मुख्याध्यापकास तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथील अंदाजे चार पाच वर्षांपासून शासकीय बचत गट प्रशिक्षणातून लापता आदिवासी गरीब कुटुंबातील महिलेचा आज पर्यंत शोध लागला नसल्याने या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ दिप्ती सुर्यवंशी यांना देण्यात आले. या मोर्च्यात केम तुकुम आदिवासी कृती समिती,भाजप आदिवासी आघाडी जिल्हा चंद्रपूर,आक्रोड संघटना जिल्हा चंद्रपूर,आदिवासी विकास परिषद चंद्रपूर,बिरसा क्रांती दल चंद्रपूर,आक्रोड संघटना सर्व तालुके,गोंडराजे खंडक्या बल्लारशाह स्मारक समिती,राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळ ,चंद्रपूर व बिरसा सेना जिल्हा चंद्रपूर ह्या संघटना मोर्च्यात सहभागी होत्या. येत्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा न्याय निवडा व पीडित विद्यार्थिनींना आर्थिक मदत न मिळाल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.




Post a Comment

0 Comments