महिलेला बीआयटी चे प्राचार्य व पॉलिटेक्निक चे प्राचार्य या दोघांवर विनयभंग ची गंभीर आरोप

 


महिलेला बीआयटी चे प्राचार्य व पॉलिटेक्निक चे प्राचार्य या दोघांवर  विनयभंग ची गंभीर आरोप

  ◾मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकीचा आरोप ! 

◾बल्लारपूरात शैक्षणिक वर्तुळात खळबळ : बीआयटीच्या प्राध्यापिकेने केली आपल्या सहप्राध्यापकाची तक्रार 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे विद्या दान म्हणून ओळखले जाते प्राचीन काळापासून गुरूला अनन्य साधारण महत्व आहे मात्र बदलत्या काळानुसार शिक्षकांची प्रतिमा मलिन होत चालली आहे अनेक ठिकाणी शिक्षकांनी आपल्या लहान लहान विद्यार्थ्याचा विनयभंग केल्याच्या बातम्या प्रसिध्द होतात बल्लारपूरात तर शिक्षकांनीच शिक्षकावर अन्याय केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. शैक्षणिक वर्तुळात गत काही वर्षांपासून कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत वादग्रस्त ठरत असलेल्या बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका प्राध्यापक असलेल्या महिलेला बीआयटी चे प्राचार्य व पॉलिटेक्निक चे प्राचार्य या दोघांनी आधी विनयभंग केला .त्यानंतर मानसिक छळ करीत असिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. असल्याचा आरोप पीडित प्राध्यापक महिलेने चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद मध्ये केला . यासंदर्भात पीडित प्राध्यापक महिलेने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी कुठलीही दखल न घेतल्याने आज त्या महिलेने यासंबंधी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेट देऊन सदर प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केले . असल्याचे सांगण्यात आले .सदर महिला प्राध्यापक बीआयटी मध्ये मागील सहा वर्षांपासून मायनिंग विभाग म्हणून कार्यरत आहेत. आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सदर महिलेने सांगितले की ६ ऑक्टोंबर २०२१ रोजी आपल्या कक्षात बसून असतांना प्राचार्याच्या दर्जा असलेल्या असणाऱ्या दोन्ही प्राध्यापकांनी कक्षात प्रवेश केला व अत्यंत जोरजोरात घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली व विद्यार्थ्यांना भडकावण्याचा आरोप केला . हाप्रकार सहन न झाल्याने कक्षा बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता एका प्राध्यापकाने हात पकडला व हाताला इजा झाली .तर दुसर्‍या एका प्राध्यापकाने ड्रेस ओढण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या तावडीतून सुटून थेट संस्थाध्यक्षा कडे गेली मात्र संस्था अध्यक्ष ने  भेट देण्याचे टाळल्याने अखेर पोलिसात जाऊन तक्रार दिली . मात्र तोपर्यंत या महाविद्यालयाकडून पोलिसांवर दबाव आल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप या महिलेने केला या नंतरही माझ्या छळ सुरूच असल्याचे प्राध्यापक महिलेने सांगितले फोन करून बिहार झारखंड या विद्यार्थ्यांना फोन नंबर माझ्याकडून मागितले व त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर, कट्टा बोलवायचे आहे असे सांगून तुला मारण्यासाठी कट रचला जात असल्याचा इशारा दिला असल्याचे तिने सांगितले सदर महाविद्यालयात परराज्यातील विद्यार्थ्यांच्या हातून शत्रे बोलावले जात असल्याचा धक्कादायक आरोप केला .महाविद्यालयात काम करीत असताना संबंधित या दोन्ही प्राध्यापक माझ्यावर सातत्याने टिप्पणी करीत असल्याचा आरोप सदर प्राध्यापक महिलेने केला. मला अँसिड टाकून मारण्याची धमकी दिली असल्याचेही यावेळी प्राध्यापक महिलेने सांगितले स्थानिक पोलिस कारवाई करीत नसल्याचे अखेर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असून संबंधितांवर कारवाई करावी त्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात यावे अशी मागणीही या वेळी सदर प्राध्यापक महिलेने केली आहे.




Post a Comment

0 Comments