प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगावचा पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांचेशी सुसंवाद

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगावचा पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांचेशी सुसंवाद

यवतमाळ ( राज्य रिपोर्टर ) : मारेगाव पोलीस ठाणेत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुरी यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तालुका मारेगावच्या वतीने स्वागत करण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे यांच्या उपस्थितीत संघाचे मारेगाव तालुका अध्यक्ष अनंतराव गोवर्धन यांच्या हस्ते नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुरी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. आणि त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश पुरी म्हणाले की, पोलीस प्रशासन व पत्रकार यांनी एक-मेकास सहकार्य करणे गरजेचे आहे. कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजहितासाठी सहकार्य करणे गरजेचे असते. तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था कायम राहणे महत्वाचे आहे.

 याप्रसंगी संघाचे तालुका उपाध्यक्ष पंकज नेहारे, तालुका सचिव सचिन मेश्राम, सहसचिव सुदर्शन टेकाम, सल्लागार अमोल कुमरे, मार्गदर्शक राजू डवे, संघटनेचे सदस्य व पत्रकार आनंद नक्षने, पत्रकार सूरज झोटिंग, पत्रकार सुमित गेडाम, पत्रकार विवेक तोडसे पत्रकार सुरेश पाचभाई आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments