मिशन कवच-कुंडल अभियानास ३० ऑक्टोम्बर पर्यंत मुदतवाढ



मिशन कवच-कुंडल अभियानास ३० ऑक्टोम्बर पर्यंत मुदतवाढ 

◾नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याचे प्रशासनाचे आवाहन 

◾बल्लारपूर नगर परिषद द्वारे दिनांक १६ ऑक्टोम्बर ते २३ ऑक्टोम्बर पर्यंत मिशन कवच-कुंडल अंतर्गत विशेष अभियान 


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या पुढाकारातून देशपातळीवर व राज्यस्तरावर कोरोना लसीकरण करण्यासाठी मिशन कवच-कुंडल अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत बल्लारपूर नगर परिषद द्वारे दिनांक १६ ऑक्टोम्बर ते २३ ऑक्टोम्बर पर्यंत मिशन कवच-कुंडल अंतर्गत विशेष अभियान राबविण्यात येत आहे याअंतर्गत नगर परिषदेचे अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश असून १६ पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक पथकास २ प्रभागाची जबाबदारी देण्यात येऊन या पथकाने घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करून नागरिकास लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे यामुळे बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रात लसीकरनात वाढ झाली असून या दरम्यान १३२४४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे या अभियानात १२ लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आले असून नागरिकांच्या सोयिकरिता पुढील लसीकरण केंद्र आहेत. 1) पंडित दीनदयाल वॉर्ड ( दुर्गा मंदिर ), 2) डॉ.राजेंद्रप्रसाद वॉर्ड ( सातकर अंगणवाडी ), 3) कन्नमवार वॉर्ड ( भगतसिंग प्रा.शाळा ), 4) फुलसिंग नाईक वार्ड ( बंजारा वार्ड ), 5) गोकुल नगर वार्ड ( तेलसे अंगणवाडी ), 6) महाराणा प्रताप वार्ड ( वाल्मिकी समाज मंदिर ), 7) बालाजी वार्ड ( ग्रामीण रुग्णालय, महात्मा गांधी शाळा ), 8) शिवाजी वार्ड ( बीटीएस प्लॉट अंगणवाडी ), 9) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 10) सरदार पटेल वार्ड ( डॉ.आंबेडकर प्राथमिक शाळा ), 11) सुभाष वार्ड ( सुंचुवार वाचनालय ) व 12) एक फिरते केंद्र असे 12 केंद्र तयार करण्यात आले असून या सर्व केंद्रावर 30 ऑक्टोम्बर पर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे त्यामुळं नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यापेक्षा 30 ऑक्टोम्बर पर्यंत लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments