अग्नी कांडातील कामगारांची नुकसान भरपाई कंत्राटदाराने तात्काळ दयावी - आ. किशोर जोरगेवार

 


अग्नी कांडातील  कामगारांची नुकसान भरपाई कंत्राटदाराने तात्काळ दयावी - आ. किशोर जोरगेवार

🔹घटनास्थळी भेट देत जळालेल्या भागाची पाहणीभविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : सिलेंडरचा स्पोट झाल्याने आग लागलेल्या निर्माणाधीन नविन मेडीकल काॅलेजची आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून अग्नी कांडात कामगारांच्या झालेल्या नुकसाणीची भरपाई संबधीत कंत्राटदाराने तात्काळ द्यावी अशा सुचना त्यांनी केल्या आहे. संबधीत कंत्राटदारानेही सदर कामगारांना साधन - सामृग्री 12 तासात देण्याचे मान्य केले आहे.

    यावेळी मेडीकल काॅलजचे व्यवस्थापक अमाशीद खोत,  बिनोद कुमारअशोक गुप्ता यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक पंकज गुप्ताकलाकार मल्लारपअमोल शेंडेप्रा. श्याम हेडाऊ,  सलीम शेखराशिद हुसेनविलास वनकरविलास सोमलवारविनोद अनंतवारअॅड. परमहंस यादवनितीन शाहागौरव जोरगेवारबबलू मेश्रामतिरुपती कलगुरुवार आदिंची उपस्थिती होती.

    मंगळवारच्या रात्री निर्माणकार्य सुरु असलेल्या नविन मेडीकल काॅलेजच्या परिसरात असलेल्या कामगारांच्या वसाहतीला अचानक आग लागली यावेळी येथे असलेल्या आठ सिलेंडरचा स्पोट झाल्याने आग आणखी भडकली या आगीत येथील कामगारांचे जिवनावश्यक सर्व सामान जळून खाक झाले. त्यानंतर या कामागारांना शक्य ती मदत करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. तेव्हा पासून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथे मदतकार्य सुरु होते. त्यांनतर  आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच यंग चांदा ब्रिगेडच्या मदतकार्याचा आढावा घेत त्यांच्या कामाचे कौतूक केले.

    कंत्राटदारानेही या आगीत नूकसाण झालेल्या कामगारांना मदत करण्याच्या सुचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्यात त्यानंतर सदर कामगारांना कपडेभोजन सामृग्रीव जिवनावश्यक वस्तु १२ तासाच्या आत देण्याचे संबधीत कंत्राटदाराने मान्य केले आहे. यापूढे अशी कोणतीही घटना घडू नये या करिता फायर संबधीत उपकरण व इतर सोई सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. येथील कामगारांना सुरक्षा साधन देण्यात यावेत्यांच्या सुरक्षे संबधी उपाय योजना करण्यात याव्हात  अश्या सूचनाही  यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्या असून येथील उपाय योजनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक कमेटी तयार करणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.



Post a Comment

0 Comments