गळफास घेऊन एकाची आत्महत्या तर बामणी येथील मामा तलावात बुडून एकाचा मृत्यू



गळफास घेऊन एकाची आत्महत्या तर बामणी येथील मामा तलावात बुडून एकाचा मृत्यू 

◾बल्लारपूर तालुका ची घटना

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथील लोकमान्य टिळक वार्डातील रहिवासी असलेले नामदेव वासुदेव खाडे वय-५६ वर्ष यांनी आपले क्वार्टर नंबर २६/८ वेकोली वसाहत राहते घरी आज सकाळी ७:०० ते ७:३० वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली या प्रकरणाची माहिती मृतकाचे जावई श्रीकृष्ण चिमनकर यांनी पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे दिली यावरून बल्लारशाह पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे नेमका कोणत्या कारणावरून सदर व्यक्तीने गळफास घेतला याबाबतचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

       तर दुसऱ्या एका घटनेत काल १७ नोव्हेम्बर २०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान बामणी येथील वॉर्ड नं 1 मधील रहिवासी असलेले किशोर मडावी वय-४२ वर्ष यांचा बामणी येथील मामा तलावात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली मात्र या घटनेची माहिती सायंकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान कळली सूत्राच्या माहितीनुसार मृतकाला दारूचे व्यसन होते तसेच त्यांच्या अतिमद्यप्राशनामुळे पत्नी ही सोडून गेली होती त्यामुळे नैराश्याच्या भावनेतून  तर त्याने आत्महत्या तर केली नाही ना? असाही प्रश्न निर्माण होतो आहे आज सकाळी मृतदेह मिळाला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.






Post a Comment

0 Comments