आदिवासी बांधवांचा सोमवारी आक्रोश मोर्चा

  


आदिवासी बांधवांचा सोमवारी आक्रोश मोर्चा

◾बल्लारपुरात केम तुकूम जि. प. शाळेतील मुलींचे विनयभंग प्रकरण

◾भाजपा आदिवासी आघाडीसह विविध सामाजिक संघटनेचा सहभाग

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर )  : बल्लारपूर तालुक्यातील केम तुकूम जिल्हा परिषद शाळेतील सात मुलीवर वर्षभरापासून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकाने लैगिक अत्याचार केला. ही समाज मन सुन्न करणारी घटना चार आक्टोबर रोजी उघडकीस आली. या घटनेतील आरोपी भाऊराव यादव तुंबडे आजघडीला कारागृहात आहे.मात्र आदिवासी समाजाला जलद गतीने न्याय मिळावा म्हणून आदिवासी समाज आग्रही आहे. याच अनुषंगाने सोमवार ( दि 18)रोजी दुपारी 12 वाजता केम तुकूम येथून उपविभागीय कार्यालय, बल्लारपूर पर्यंत मूक मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्च्यात भाजप आदिवासी आघाडी सह आदिवासी समाजाच्या विविध सामाजिक संघटनेचा सहभाग राहणार असल्याची माहिती भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष व जि. प. सदस्य हरीश गेडाम यांनी दिली.

आदिवासी समाजातील महिला, अल्पवयीन मुलीवर लैगीक, शारीरिक व मानसिक शोषणाच्या घटना वारंवार घडत आहेत. केम तुकूम येथील घटना शिक्षकी पेशाला व मानवतेला काळिमा फासणारी आहे.अशा प्रकारच्या घटनेत न्याय मिळण्यासाठी नेहमी विलंब लागतो.याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आदिवासी समाजाला न्याय मिळावा म्हणून केम तुकूम येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी केम तुकूम येथून मूक मोर्चा काढला जाणार आहे. आदिवासी राजे खांडक्या बल्लाळशाह यांच्या समाधी स्थळाला मोर्च्यातील आदिवासी बांधव अभिवादन करून बल्लारपूर उपविभागीय कार्यालयावर धडक देणार आहे.यावेळी आदिवासी बांधव न्याय मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर करणार आहे.

केम तुकूम येथील अल्पवयीन शाळेकरी मुलीवर अत्याचार प्रकरणी न्यायलयीन प्रकरणात नामांकित वकिलाची नियुक्ती शासनाने करावी.या घटनेचा निकाल लावण्यासाठी जलद गती न्यायलयात खटला चाळविण्यात यावा.पोक्सो कायद्याने पीडित्यांच्या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत द्यावी.बल्लारपूर तालुक्यातील कवडजई आदिवासी समाजातील बेपत्ता महिलेचा शोध घेऊन सीबीआय चौकशी करण्यात यावी, आदी मागण्या आदिवासी बांधवानी लावून धरल्या आहेत.

आदिवासी समाजाला जलद न्याय मिळावा म्हणून केम तुकूम आदिवासी कृती समिती, भाजपा आदिवासी आघाडी,गोंडवाना गणतंत्र पार्टी,अफ्रोट संघटना,आदिवासी विकास परिषद,बिरसा क्रांती दल,गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह स्मारक समिती,राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळ व बिरसा सेना संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवाचा मोर्चा आयोजित केला असून समाज बांधवानी न्याय हक्कासाठी मोर्च्यात सहभागी होण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments