अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नागपुरातून येथून सुटका ! सुटका !

  


 अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची  नागपुरातून येथून सुटका !

◾चंद्रपूर  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

◾लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्या

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दि.१५/१०/२०२१ रोजी पो.स्टे.पोंभुर्णा हद्दीतील एक अल्पवयीन मुलीला आरोपी नामे वैभव संदीप कुचनकर रा. हनुमान मंदीर जवळ चंद्रपूर यांने लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्या बाबतची तक्रार दि.१६/१०/२०२१ रोजी दिल्याने पो.स्टे.पोंभुर्णा येथे अप.क्र. १५१/ २०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये आरोपी विरूद्ध मुलींना फुस लावून पळवून नेल्या बाबत गुन्हा दाखल करण्यता आला. यातील पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने व सदरचे प्रकरण हे संवेदनशिल स्वरूपाचे असल्याने प्रकरणाचे गांभीर्य समजून मा.पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तात्काळ सदर गुन्हयाचा छडा लावण्या करीता सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ स.पो.नि.जितेंद्र बोबडे यांचे नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले.

 सदर प्रकरणातील पिडीत मुलगी व आरोपी हे नागपूर च्या दिशेने गेले असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्याने सदर गुन्हेशाखेचे पथकाने लागलीच आरोपीचा मार्ग काढीत नागपूर गाठून आरोपीतास ताब्यात घेवून पिडीत मुलीची सुटका करूण चंद्रपूर येथे आणण्यात आले. पुढील कार्यवाही सबंधीत पो.स्टे.पोंभूर्णा करीत आहे. सदरची यशस्वी कामगीरी मा. अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो.नि.जितेंद्र बोबडे, पोलीस अंमलदार पो.कॉ.व्यंकटेश नलगोंडावार /३९५, म.पो.कॉ.हुजबाना पठाण/२७४१, पो.स्टे.पोंभूर्णा यांनी केली.




Post a Comment

0 Comments