बल्लारपूर पोलीस ऍक्टिव्ह मोडवर

 


बल्लारपूर पोलीस ऍक्टिव्ह मोडवर

◾विना लायसन्स दुचाकी चालविणाऱ्या कडून दंड वसूल केला जात आहे.

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : सद्यस्थितीत बल्लारपूर शहरात सण उत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आली की काय अशी स्थिती आहे.

 मागील काही दिवसांपूर्वी बल्लारपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरात आज सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३५ पोलीस कर्मचाऱ्याच्या ५ टीम   या नगर परिषद चौक, गोल पूल, नवीन बसस्थानक, कादरीया मस्जिद चौक व बालाजी कॉम्प्लेक्स परिसरात जाऊन नाकाबंदी करून दुचाकी चालकांच्या वाहन परवाना तपासणी मोहीम सुरू केली विशेष म्हणजे गोल पूल परिसरात १२ ते १३ तर इतर ठिकाणी ५ ते ६ पोलीस कर्मचारी उपस्थित होते ज्या वाहन धारकाकडे वैध कागदपत्रे नसेल त्यांचेकडून दंड वसूल केला जात असल्याची माहिती पोलीस स्टेशन बल्लारशाह कडून प्राप्त झाली आहे.



Post a Comment

0 Comments