जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक अभ्यासिकेतून समाजाचे मार्गदर्शन व्हावे - आ. किशोर जोरगेवार

 


जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक अभ्यासिकेतून समाजाचे मार्गदर्शन व्हावे - आ. किशोर जोरगेवार

◾अरविंद नगर येथील जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक अभ्यासिकेचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) :  जेष्ठांच्या अनुभवातून आलेले विचार हे सक्षम व प्रगत समाजासाठी पोषक आहे. त्यांच्या विचारांची आणि सुचनांची समाजाने दखल घेणे आवश्यक आहे. निर्माण होत असलेल्या या जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक अभ्यासिकेतून जेष्ठांनीही समाजाला मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   जेष्ठ नागरिकांच्या मागणी नंतर अरविंद नगर येथे स्थानिक विकास निधीतून जेष्ठ नागरिकांच्या सामाजिक उपयोगा करिता 25 लक्ष रुपयांची अभ्यासिका मंजूर करण्यात आली आहे. दस-याच्या दिवशी या अभ्यासिकेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी चंद्रपूर महागनर पालिकेचे स्थायी समिती सभापती संदिप आवारीमनपा गटनेता डाॅ. सुरेश महाकुलकरमाजी नगर सेवक अविनाश पुट्टेवारयांच्यासह पसायदान जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गुंडावारउपाध्यक्ष कुसन नागोशेसचिव दादाजी नंदनवारकोषाध्यक्ष दिपक तम्मीवारस्विकृत सदस्य विजय कोंकमवार यांच्यासह संस्थेच्या इतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.

  यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले किकोरोना काळात  आमदारांच्या विकासनिधीत कपात करण्यात आली. असे असतांनाही आपण चंद्रपूरच्या सर्वसमावेशक विकासासाठी मोठा निधी उपलब्ध केला. यातून शहरी भागासह ग्राणिम भागातील मुलभूत सोयी - सूविधांवर काम होत आहे. हे सर्व कामे होत असतांना जेष्ठ नागरिक हा सुध्दा माझ्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्या विविध संस्थासाठी भरिव काम करण्याचा माझा मानस आहे. यासाठी आपण रामनगर येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाला  २५ लक्ष रुपये देणार आहोत सोबतच नगीनाबाग येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहासाठी २५ लक्ष रुपये, मुल रोडवरील विश्रांती वरिष्ठ नागरिक सेवा संघाच्या सामाजिक सभागृहासाठी २५ लक्ष रुपयेसरकार नगर येथील ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी २५ लक्ष रुपये आपण देत असल्याचे ते यावेळी म्हणाले, अरविंद नगर येथील सदर अभ्यासिकेची मागणी पूर्ण करता आली याचेही समाधान असल्याचे ते यावेळी म्हणालेमनुष्याचा वृद्धापकाळ हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण असायला हवा. त्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक सहाय्य त्यांना लाभले पाहिजे जेणेकरून शेवटची काही वर्षे त्यांना परमानंद मिळू शकेल. असा उदात्त हेतू लक्षात घेऊन तरुणपिढीने त्यांना सन्मान देणे  गरजेचे असल्याचे ते यावेळी बोलले. निर्माण होत असलेल्या सदर अभ्यासिकेचा समाजासाठी उपयोग होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  ही अभ्यासिका  सर्व - सोयी सुविधांनी सज्ज असणार असून ठराविक वेळेत पूर्ण होणार असेही ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments