पंचर दुकानावरु मोटरसायकलच्या डीक्कीतून अज्ञात चोरट्याने अडीच लाख रुपयाची रोकड केली लंपास...

 


पंचर दुकानावरु मोटरसायकलच्या डीक्कीतून अज्ञात चोरट्याने अडीच लाख रुपयाची रोकड केली लंपास...

◾घटना  चोपडा शहरातील शितलनाथ बाबा मठ परिसरातील 

जळगाव /चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : येथील,शितलनाथ बाबा मठ जवळ असलेल्या मोटरसायकल चा पंचर जोडण्यासाठी आलेल्या धीरजकुमार ईश्वर महाजन यांच्या मोटारसायकलच्या डिकीतून अज्ञात चोरट्याने अडीच लाख रुपये लांबविले.

चोपडा शहरातील यावल रस्त्या लगत असलेल्या एमआयडीसी परिसरात श्री पराग गृहउद्योग चालवणाऱ्या गृह उद्योगाचे संचालक धीरजकुमार ईश्वर महाजन यांच्या मोटारसायकलच्या डिकीतून अज्ञात चोरट्याने अतिशय गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दिवसाढवळ्या दुपारी एक वाजेच्या सुमारास शिताफीने रोख अडीच लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. पैसे लांबवून भामट्याने क्षणार्धात पोबारा केला.

धिरजकुमार महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार धीरजकुमार महाजन हे दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास नगरपालिका शेजारी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी आले होते.

त्यांनी एक वाजेच्या सुमारास अडीच लाख रुपये रोख स्टेट बँकेतून ताब्यात घेतले. स्टेट बँकेच्या समोर त्यांनी त्यांची दुचाकी लावली होती. मात्र अज्ञात भामट्यांनी दुचाकीचे पुढचे चाक हत्याराचा उपयोग करून पंक्चर केलेले होते. पंक्चर झालेला टायर दुरुस्तीसाठी श्री महाजन हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पंक्चर च्या दुकानदाराकडे गेले असता पुढील चाक तपासणीनंतर चाकात असंख्य पंक्चर असल्याने दुकान मालकाने ट्यूब बदलण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत धिरज महाजन यांनी डीक्की चा ताबा सोडलेला नव्हता, मात्र केवळ अर्ध्या मिनिटासाठी त्यांच्याच दुचाकीच्या पुढील चाकात कोणता ट्युब बसवावा हे निश्चित करण्यासाठी गेले असता त्यांच्या पाठीमागे अज्ञात चोरटा दबा धरुन बसलेला होता. या चोरट्याने क्षणार्धात डिकीतून अडीच लाख रुपये लांबवले आणि गायब झाला. सदर भामट्याने डिकीतून पैसे काढून पोबारा केल्याची घटना शेजारीच असलेल्या माचला येथील आदर्श शेतकरी रवींद्र निकम यांच्या कृषी दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेला आहे.अडीच लाख रुपये डिक्कीतून काढताना हा भामटा कैद झालेला आहे. सदर प्रकार धिरज महाजन यांच्या लक्षात न आल्याने ते थेट घरी गेले व घरी गेल्यानंतर डिक्कीतून पैसे काढण्यास गेले असता, तिची चेन उघडी होती व पैसे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यानंतर धिरज महाजन आणि मित्र कुलदीप पाटील हे चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये सदर घटनेबाबत सांगायला गेले. तात्काळ चोपडा शहर पोलीस स्टेशन मधून पोलिसांचे पथक घटनास्थळी आणि येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत भामट्याने पोबारा केलेला होता. गेल्या महिनाभरात बँकेतून पैसे काढल्यानंतर पैसे लांबविण्याची ही दुसरी घटना आहे. सध्या चोपडा शहरात पैसे लांबविण्याचे प्रकार, दुचाकी चोरून घेऊन जाण्याचे प्रकार यासह छोटेमोठे घरफोडीचे प्रकार घडण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये रात्रीची गस्त वाढवणे आणि दिवसा हे कळत नकळत सिव्हिल गणवेशात पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. धीरजकुमार ईश्वर महाजन यांच्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments