चंद्रपूर शहरातील शहर बस सेवा सुरु करा यंग चांदा ब्रिगेडची मागणी महामंडळच्या विभागीय नियंत्रक यांना निवेदन

 


चंद्रपूर शहरातील शहर बस सेवा सुरु करा यंग चांदा ब्रिगेडची मागणी

 ◾महामंडळच्या विभागीय नियंत्रक यांना निवेदन

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  कोरोना काळात बंद करण्यात आलेली शहरातील शहर बस वाहतूक सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने महामंडळचे विभागीय नियंत्रक सुतावने यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, आशा देशमूख, सविता दंडारे, चंद्रशेखर देशमूख, आनंद रणशूर आदिंची उपस्थिती होती.
   कोरोना कालावधीत शहर बस सेवा बंद करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भाव कमी होऊन संचारबंदीचे निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आले आहे. असे असले तरी महामंडळच्या वतीने शहरातील शहर बस सेवा उद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना व शालेय विद्याथ्र्यांना ऑटोने प्रवास करावा लागत आहे. शिवाय एका स्थानावरून दुसर्या स्थानावर जायला दोन ते तीन ऑटो बदलवावे लागत असल्यामुळे विद्याथ्र्यांना तसेच नागरिकांना शारिरीक, मानसिक, तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर शहर अंतर्गत बससेवा सुरु करणे आवश्यक आहे. तसेच शाळासुद्धा सुरु झालेल्या असल्यामुळे शाळकरी मुलांना शैक्षणिक सोयीच्या दृष्टीने बंद करण्यात आलेली शहर बस सेवा पूर्ववत व शाळेच्या वेळा पत्रकानुसार सुरु करण्यात यावी, चंद्रपूर बस स्थानक, जुनोना चैक ते जुनोना मार्गाचे संपूर्ण थांबे विचारात घेऊन ही शहर बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments