दोन लहान भावांनी मोठ्या भावास डिजल टाकून पेटविले



दोन लहान भावांनी मोठ्या भावास डिजल टाकून पेटविले

◾मोठा भाऊ गंभीर जखमी  चंद्रपुरात उपचार सुरू

◾दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली

गडचांदूर ( राज्य रिपोर्टर ) : येथील मुक्तीधाम परिसरात दोन सख्या लहान भावांनी मोठया भावास डिझेल टाकून पेटविले.आरोपी नामे रवी उर्फ रोहिदास रामजी मूनेश्वर (38),अमृत रामजी मूनेश्वर (30) यांनी मोठा भाऊ जयदेव रामजी मूनेश्वर (46) याला कौटुंबिक वादातून डिझेल टाकून पेटविले. जखमी जयदेवला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.सदर घटना  रविवारी सकाळी 10 च्या दरम्यान घडली,  सकाळी लहान मुलावरून आरोपी व जयदेव च्या बायकांमध्ये वाद झाला. त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी जयदेव शेतातून आल्यावर त्याच्यावर डिझेल टाकून पेटविले.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून कलम ३०७, २८५, ३४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments