बल्लारपूर तालुक्यात भीषण अपघातात २ व्यक्तीचा २ बैलासह मृत्यू

 





बल्लारपूर तालुक्यात भीषण अपघातात  २ व्यक्तीचा २ बैलासह मृत्यू 

◾बल्लारपूर येथील कळमना जवळ ट्रक ने बैलबंडी ला उडवले २ व्यक्ती व २ बैलांचा मृत्यू

बल्लारपूर( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावाजवळ आज सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास गोंडपीपरी कडून बल्लारपूर कडे येणाऱ्या भरभाव ट्रक ने बैलबंडी ला जोरदार धडक दिली असल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात २ बैलासह २ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या अपघातात मृत्यू पावलेल्या २ व्यक्ती अंदाजे ५५ वर्ष वयाच्या असून आपल्या शेतात कामाकरिता जात असताना सदर अपघात घडला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे .या भीषण अपघातानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली असून या घटनेचे वृत्त कळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवीत दोन्ही मृतदेहांना उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.







Post a Comment

1 Comments