बल्लारपूरात रेल्वे अपघातात व्यक्तीचा मृत्यू



बल्लारपूरात रेल्वे अपघातात  व्यक्तीचा मृत्यू 

◾शहरातील बीटीएस प्लॉट लगत रेल्वे लाईन जवळील घटना 



बल्लारपूर  ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील बीटीएस प्लॉट लगतच्या रेल्वेच्या अप ट्रॅक वर एका व्यक्तीचा रेल्वे ने कटुन मृत्यू झाल्याची माहिती आहे सदर घटना १४/१०/२०२१ ला घडली असून या घटनेची प्राथमिक माहिती नरेंद्र सत्यनारायण मुप्पीडवार वय ४५ वर्ष, रा.श्रीराम वार्ड बल्लारपूर यांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे रेल्वे उपप्रबंधक श्री.ए.यु.खान यांचे कार्यालयातून मेमो व तोंडी रिपोर्ट दिला की बीटीएस प्लॉट जवळील अप रेल्वे ट्रॅक वर अजय गणेश वेलादी वय २३ वर्ष रा.शिवाजी वार्ड, क्रीडा मंडळ जवळ, बल्लारपूर व्यक्ती पुरुष यांचे डोके व धड वेगळे होऊन मृतदेह पडून असल्याची रिपोर्ट दाखल केली यानुसार मर्ग क्र ८२/२०२१ कलम १७४ फ़ो. प्र.स प्रमाणे दाखल करून तपास सुरू आहे. मृतकाच्या अंगात काळी टी-शर्ट, काळा हाफ पॅन्ट, पायात निळ्या रंगाची सँडल घातली आहे. या विषयीच्या अधिक माहितीनुसार सदर व्यक्तीची आई ५ महिन्यांपूर्वी मरण पावली असून तेव्हापासून तो दारूच्या आहारी गेला होता. कुटुंबियांच्या माहितीनुसार दोनच दिवसापूर्वी कोरोनाची वॅक्सिंन घेतली होती आणि सतत दारू पित होता त्यामुळे  कुटुंबीयांनी हटकले असता काल दि.१४/१०/२०२१ रोजी अंदाजे रात्रीच्या सुमारास घराबाहेर जावून रेल्वे ट्रॅक वर जाऊन आत्महत्या केली असावी असे सूत्राच्या माध्यमातून माहिती मिळाली यासंबंधीचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.



Post a Comment

0 Comments