वेकोली ( WCL ) कामगारांची आत्महत्या

  


वेकोली  ( WCL )  कामगारांची आत्महत्या 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्ड येथील रहिवासी असलेले देविदास गोसाई ईटनकर वय ( ५२ ) वर्ष, विविध आजाराने त्रस्त असल्यामुळे आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज गुरुवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली सूत्राच्या माहितीनुसार देविदास हा विविध आजाराने ग्रस्त होता त्यामुळं शक्यता अशी आहे की तो या विविध आजाराने ग्रस्त असल्यामुळंच आत्महत्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं देविदास ने पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची माहिती होताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.










Post a Comment

0 Comments