बल्लारपूर तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न



बल्लारपूर तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : विमाशी संघ तालुका बल्लारपूर ची  सहविचार सभा शनिवार दि. 4 सप्टेंबर 2021 ला जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथे   पार पडली. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका डब्ल्यू. ए. शेख मॅडम उपस्थित होत्या. 

     वर्ष 2022 मध्ये होणाऱ्या विधान परिषदेचे उमेदवार तथा प्रमुख मार्गदर्शक मा. सुधाकर अडबाले सरकार्यवाह विमाशी, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष मा. केशवराव ठाकरे, मा. श्रीहरी शेंडे कार्यवाह, मा. लक्ष्मणराव धोबे कार्याध्यक्ष, सत्कार मूर्ती मा. राजेंद्र  खाडे विजुक्टा जिल्हाध्यक्ष, मा. दीपक धोपटे सिनेट सदस्य, मा. प्रमोद कोंडलकर सर राजूरा, मा. श्रीधर फटाले माजी मुख्याध्यापक, मा. एम. डि. कोपुलवार माजी मुख्याध्यापक, मा. जी. एन. जुआरे माजी मुख्याध्यापक, मा. बि. बि. भगत मुख्याध्यापक जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर,  पर्यवेक्षक मा. जी. एच. खिरटकर, मा. पोडे सर मुख्याध्यापक सर्वोदय विद्यालय बल्लारपूर, मा. आशा पाटील उपमुख्याध्यापिका, तालुका मार्गदर्शक मा. अनिल वाग्दरकर, मा. एम. टी. साव स( मुलनिवासी ), मा. आर. आर. निखाडे तालुका अध्यक्ष, मा.  चंद्रकांत पावडे सचिव, मा. सुरेश पंदीलवार सर मंचावर उपस्थित होते. 

सुरवातीला 5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष आर. आर. निखाडे यांनी केले. 

  नोव्हेंबर/ डिसेंबर 2022 ला होऊ घातलेल्या नागपूर विभाग शिक्षक आमदार निवडणुकीविषयी संघटनेची पुढील रणनीती यावर मा. श्रीहरी शेंडे व मा. केशवराव ठाकरे सर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. याप्रसंगी मा. राजेंद्र खाडे व मा.  दीपक धोपटे सर यांचा सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल मा. सुधाकरराव अडबाले सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बल्लारपूर तालुक्याच्या वतीने मा.सुधाकरराव अडबाले सरकार्यवाह  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांचा सत्कार करण्यात आला.  विमाशीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरजी अडबाले यांनी शिक्षक संघटनेच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच गडचिरोली जिल्ह्यामधील कोरची येथिल शाळेची समस्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची वैयक्तीक व सामुहिक समस्या, एकस्तर पदोन्नति, नक्षलग्रस्त प्रोस्ताहन भत्ता, आश्रमशाला समस्या, अतिरीक्त कर्मचारी समस्या, समयोजन शिबिर, DCPS खात्यात जमा असलेली सर्व रक्कम NPS खात्यात वर्ग करणे, वरिष्ठ/ निवड श्रेणी, GPF/ मेडिकल बिले व थकीत देयके, नियमीत वेतनास होणारा विलंब, सातव्या वेतन आयोग दुसरा हफ्ता, DCPS/ GPF पावत्या, संचमान्यता 2019 - 20  व  2020 - 21, खातेमान्यता / मंडळ मान्यता व RTE मान्यता, थकीत महागाई भत्ता जुलै 19 ते नोव्हेंबर 19- 5 टक्के नुसार बाकी असलेले पाच महीने मिळणेबाबत तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव 11 टक्के महागाई भत्ता तात्काळ मिळणे या व इतर विविध प्रलंबित समस्यांवर सभेत मा. अडबाले सरांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षिय भाषण मा. डब्ल्यू. ए. शेख , मुख्याध्यापिका, जनता विद्यालय( सिटी ब्रांच ) बल्लारपूर कार्यक्रमाचे संचालन पी. एम. उरकुंडे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार एम. एन. पानघाटे यांनी केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज मत्ते, राजू वानखेडे, एस. एन. टोंगे, डि. एल. कुबडे, रोहनकर सर, उदय रांगणकर, राघोबा आलाम सर, पी. आर. सातपुते, एस. डब्ल्यू. गेडाम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







Post a Comment

0 Comments