धक्कादायक घटना : मित्रानेच मित्राचा केला खून,बालपणीचा मित्रच निघाला खुनी



धक्कादायक घटना : मित्रानेच मित्राचा केला खून,बालपणीचा मित्रच निघाला खुनी 

 ◾दुर्गापूर येथील घटना 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : या जगात सर्व नाती ही कुटुंबाच्या स्वरूपात मिळतात मात्र मित्रत्वाचे असे एक नाते असते ज्याची निवड आपण स्वतः करू शकतो काहींच्या मते " एक चांगला मित्र हा अनेक पुस्तकांची बरोबरी करू शकतो " मात्र असाच एक मित्र जर मित्राचा खून करीत असले तर मैत्रीच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. अशाच प्रकारची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडली आहे. बालपणीच्या एका मित्रानेच दारूच्या नशेत मित्राचा घात केल्याची धक्कादायक घटना दुर्गापुरात ०९ सप्टेंबरला घडली आहे. दुर्गापुरात राहणारा अक्षय कातकर वय-२६ वर्ष व सूरज उर्फ संजय यादव वय-२८ हे दोन्ही बालपणीचे मित्र बालपणापासून सोबतच असायचे मात्र मिळालेल्या माहितीनुसार ०९ सप्टेंबरला हे दोघेही मद्यप्राशन करून दुचाकीने जात होते संजय हा दुचाकी चालवीत होता तोही मोठ्या वेगाने व अक्षय हा दुचाकींचा वेग कमी करण्यासाठी सांगत होता मात्र संजय हा काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता नंतर दुर्गापूर येथील जनता विद्यालयाजवळ दुचाकी थांबविली व याबाबीवरून दोघात वाद झाला वाद इतका वाढला की वादाचे रूपांतर मारहाणीत झाले संजयने अक्षयला जबर मारहाण केली या मारहाणीत अक्षय अर्धमेला झाला समजून संजयने घटनास्थळावरून पोबारा केला मात्र एका व्यक्तीने सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास अक्षयच्या कुटुंबियांना माहिती दिली की अक्षय हा जखमी अवस्थेत पडला आहे ही माहिती मिळताच अक्षयच्या कुटुंबीयांनी अक्षयला रुग्णालयात दाखल केले मात्र  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले मृतकाच्या कुटुंबीयांनी तात्काळ दुर्गापूर पोलीस स्टेशनला संजय विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पुढील तपास स्वप्नील धुळे पोलीस निरीक्षक दुर्गापूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण सोनुने करीत आहेत.






Post a Comment

0 Comments