चंद्रपुरात वर्दळीच्या ठिकाणी परिसरातून भरदिवसा दुचाकीची चोरी
◾पोलिसांच्या तत्परतेने ५ दुचाकीसह २ लाख २० हजार रु चा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिक आपल्या कामासाठी येत असतात अशाच कामासाठी चंद्रपूर शहरातील गोपालपुरी वॉर्ड निवासी श्री. मेघश्याम एकनाथ वरारकर हे १७ सप्टेंबरला कामानिमित्त गांधी चौक परिसरात आले असता काम आटोपून परत जाताना त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले त्यांनी शोधाशोध करून दुचाकी न मिळाल्याने याची तक्रार शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता संशयाच्या आधारावर रसूल शेख वय ( ३७ ) वर्ष रा.घुटकाला वार्ड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली देऊन आणखी ४ दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली यावरून शहर पोलिसांनी आरोपिकडून ४ दुचाकी जप्त केल्या यापैकी ४ दुचाकीच्या चोरीची शहर पोलिसात नोंद आहे तर १ लावरीस असल्याचे माहिती आहे आरोपीला ताब्यात घेऊन दुचाकी स्वरूपात २ लाख २० हजार रु चा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वाखाली पोउनी वाघमारे, विजय कोरडे, दौलत चालखुरे, रामकीशन सानप, जयंत चुणारकर ई नी केली.
0 Comments