कोणताही मोबदला व नौकरी न देता आदिवासींना त्यांच्या मालकी हक्कापासून वंचित - न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार

 

कोणताही मोबदला व नौकरी न देता आदिवासींना त्यांच्या मालकी हक्कापासून वंचित - न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार

🔹माणिकगड सिमेंट कंपनीने कुसूंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांचा इशारा 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : माणिकगड सिमेंट कंपनीने कुसूंबी येथील 24 आदिवासी शेतकर्‍यांच्या 63.62 हेक्टर आर. शेतजमिनी बळकावून कोणताही मोबदला व नौकरी न देता आदिवासींना त्यांच्या मालकी हक्कापासून वंचित केले असल्याचा आरोप करीत, न्याय न मिळाल्यास कुटूंबासह आत्मदहन करण्याचा इशारा आदिवासी शेतकर्‍यांनी शनिवार, 18 सप्टेंबर रोजी येथील चंद्रपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिला. कंपनी व अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, संबंधीत 24 आदिवासींना 1984 पासून आजपर्यंत पिकांची नुकसान म्हणून प्रति 1 लाख रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, प्रति एकर 25 लाख प्रमाणे कंपनीकडून शेतजमिनिचा मोबदला द्यावा, या आदिवासी कुटुंबातील सदस्यांना शासकीय नियमानुसार 3 एकर प्रमाणे 1 कायमस्वरुपी नोकरी द्यावी किंवा शेतामधून जेवढे चुनखडी उत्खनन केले आहेत. तेवढे सरकारी नियुमानुसार 1 हजार 100 रुपये प्रति ब्रास प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, राष्ट्रीय संपत्तीचेसुध्दा करोडो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे ती नुकसान भरपाई वसुल करावी व कुसूंबी गावाचे पुनर्वसन व पुर्नस्थापना करावी, या मागण्या 21 सप्टेंबरपर्यंत मान्य न झाल्यास सर्व 24 आदिवासी कुटुंबासह आत्मदहन करणार, असा इशारा आदिवासींनी दिला. पत्रपरिषदेला भारत आत्राम, आनंद मेश्राम, नामदेव उदे, किसन जाधव, निळकंठ आत्राम आदी आदिवासी शेतकरी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments