धुपे खुर्द गावांमध्ये आदिवासी बांधवांना खावटी योजनेंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप
जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : तालुक्यातील धुपे खुर्द या गावांमध्ये आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वितरित करण्यात आले या ठिकाणी उपस्थित एकलव्य संघटना चोपडा तालुका उपाध्यक्ष आप्पा अहिरे व सरपंच बाळू आहिरे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावठी अनुदान वाटप करण्यात आले आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांनाकरिता महाराष्ट्र शासनाची खावटी अनुदान योजना अंतर्गत मटकी एक १ किलो, चवळी २ किलो, हरभरा ३ किलो, पांढरा वाटाणा १ किलो, तूरदाळ २ किलो, उडीत डाळ १ किलो, मीठ ३ किलो, गरम मसाला ५०० ग्रम, शेंगदाणे तेल १ लिटर, मिरची पावडर १ किलो, चहा पावडर ५०० ग्रम, साखर ३ किलो, असे १८ किलो.ग्रम व १ लिटर असे अन्य धान्य, कड धान्य, व जीवनावश्यक वस्तूंचा या कीटमध्ये समावेश असतो. धुपे खुर्दे ग्रामपंचायत अंतर्गत पात्र लाभार्थींना देण्यात आल्या.यावेळी लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
0 Comments