चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जामगाव येथील शेतक-याला मदत

 



चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जामगाव येथील शेतक-याला मदत

◾स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जामगाव व परीसरातील ग्रामीण जनतेमधे कोरोना प्रादुर्भावाविषयी जाणिवजागृती 

वरोरा ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर द्वारा शेतकरी कल्याण निधी अंतर्गत वरोरा तालुक्यातील जामगाव येथील शेतकरी संजय किसन काकडे यांना आर्थीक मदत करण्यात आली.  काकडे यांच्या शेतातील गोठा व शेती अवजारे जळाल्याने त्यांना तात्काळ मदत देण्यात आली आहे. सदर योजना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह चंदनसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या व यांच्या सूचनेनुसार बॅंकेच्या संचालक मंडळाद्वारा राबविण्यात येत आहे.

यावेळी बैकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरेकर, वसंताभाऊ मानकर, सरपंच जोत्सनाताई घागी, गणेश घागी, माजी पोलीस पाटील विक्रम कुरेकार, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद डाहुले, गोपाल राजपुत, ग्रा.स. संगीताताई घोगे, जोसनाताई कुरेकार, आदी उपस्थित होते. बैंकेतर्फे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर यांचे कुटूंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू, वीज पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, वन्यजीव प्राण्यांमुळे मृत्यू, गुरे ढोरे मृत्यू पडल्यास, गोठा जळाल्याने व शेतातील धान्य, पिक जळाल्याने होणा-या नुकसानाची भरपाई स्वरुपात देण्यात येत आहे.  यासाठी शेतकरी, शेतमजूर बंधूंना पोलीस एफआयआर, पटवारी पंचनामा जोडून संबधित शाखेत अर्ज करावा लागतो.

स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रवि शिंदे यांनी यावेळी जामगाव व परीसरातील ग्रामीण जनतेमधे कोरोना प्रादुर्भावाविषयी जाणिवजागृती केली. जनतेला कोरोना काळात घ्यावयाची काळजी व कोविड लस घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांनी कोरोना योध्दा बणून कोरोनामुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.







Post a Comment

0 Comments